निसर्गाने बनवलेलं हे जग खरोखरंच विचित्र आहे. अनेक विचित्र जीव इथे सापडतात. या विचित्र प्राण्यांबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित होत असतात. आतापर्यंत रंग बदलणारे अनेक प्राणी तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी रंग बदणारे ऑक्टोपस पाहिलेत का? जर नसेल पाहिला तर असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ऑक्टोपस पाण्यात गेल्यानंतर त्याचा रंग बदलतो.

आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्टोपसचे व्हिडीओ पाहिले असतील. पण ऑक्टोपसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जो व्हायरल होतोय, तो व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला एखादा चमत्कार असल्याचाच भास होईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरूवातीला ऑक्टोपस पाण्यात पोहचाना दिसून येतोय. पांढराशुभ्र असलेला हा ऑक्टोपस हा हळूहळू ज्या रंगावर बसतोय, अगदी त्याच्याशी मिळताजुळता रंगात बदलताना दिसून येतोय. कधी आकाशी तर कधी तांबड्यात रंग बदलणारा हा ऑक्टोपस पाहून प्रत्येक जण हैराण होतोय. पाहता पाहता हा पांढरा ऑक्टोपस कलरफूल बनतो. फक्त रंगच नाही तर ऑक्टोपस आपला आकारही बदलताना दिसतो आहे. मध्येच त्याच्या शरीरावर स्पाइक म्हणजे काट्यासारखी रचना झाल्याचंही दिसतं.

आणखी वाचा : भाज्यांच्या सालीपासून बनवला इकोफ्रेंडली कागद; ११ वर्षीय चिमुरडीचा यशस्वी प्रयत्न

आणखा वाचा: VIDEO : कोलांटी उडी घेत शॉर्ट्स घालण्याचा तरुणाचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल!

रंग बदलणारा ऑक्टोपस पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं आहे. ऑक्टोपससुद्धा रंग बदलतो यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. व्हिडीओ प्रत्यक्षात पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. बहुतेकांना हे स्वप्न वाटतं आहे.