News Flash

विमानात सहप्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका, BSF जवानाने वाचवले प्राण

भारतीय लष्कराचे जवान मदतीसाठी नेहमी तयार आसतात.

भारतीय लष्कराचे जवान मदतीसाठी नेहमी तयार आसतात. अडचणीत असणारा व्यक्ती असो किंवा जनावारांना मदत करायची असो. भारतीय जवान नेहमी तयार असतात. असाच भारतीय जवानाचा एक किस्सा समोर आला आहे. तो वाचून तुम्हाला जवानाबद्दलचा आदर आणखी वाढणार आहे.

विमानामध्ये प्रवास करताना एका प्रवाशाला अचानक ह्रदयामध्ये दुखू लागले. त्या प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्या व्यक्तीच्या बाजूच्या सीटवर BSF जवान प्रवास करत होता. प्रसंगावधान पाहत त्या जवानाने सहप्रवाशाची तात्काळ मदत केली आणि जीव वाचवला. बीएसएफने आपल्या अधिकृत खात्यावरून ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीएसएफने त्या जवानाचे प्रसंगावधान पाहून त्याच्या या कामगिरीला सलाम केला आहे. ट्विट करत बीएसएफने म्हटलेय की, एक प्रहरी कधीच सुट्टीवर नसतो.

विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला श्वास घेताना त्रास होत होता. त्याबरोबरच अचानक छातीत दुखायला लागले होते. अशी अपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विमानात अचानक गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी बीएसएफ जवानाने समोर येऊन योग्य ती पावले उचलत मदत केली.

बीएसएफमध्ये कार्यरत असणारे डॉ. लोकेश्वर खजुरिया असे त्या कौतुकास्पद जवानाचे नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 10:11 am

Web Title: off duty bsf jawan saves the life of a fellow passenger bsf nck 90
Next Stories
1 Viral Video : क्रिकेटच्या सामन्यात शोले इफेक्ट, जेव्हा नाणं सरळ पडतं…
2 VIDEO: ‘हम पाकिस्तानी हैं और पाकिस्तान हमारा है’; फुटीरतावादी नेत्याची घोषणाबाजी
3 56 टक्के उच्चभ्रू तरूणींना हवा विदेशी दादला
Just Now!
X