“ताटातलं संपव… अनेकांना एकवेळचं जेवणही मिळत नाही…” असं आपण रोज घरी ऐकत असतो. त्या वाक्याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर हा व्हिडीओ पाहायला विसरू नका. तो पाहून कदाचित तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ आहे एका गरीब म्हाताऱ्याचा… तो रेल्वे स्टेशनवर आहे. त्याच्या हाती चपाती आहे. दुसरा हात अधु आहे. तो नळावर येतो… पाण्याखाली चपाती धुतो आणि लगेच ती खायला लागतो… मन हेलावून टाकणारं दृश्य…

सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी भावुक होऊन कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडीओ कोणत्या रेल्वे स्थानकावरील आहे हे अद्याप समोर आलेले नाही. ती व्यक्ती नेमकी कोण हेही अद्याप समजू शकलेलं नाही. त्या व्यक्तीवर चपाती धुवून खाण्याची का वेळ आली? ती चपाती कचऱ्यातली होती का? की कुठे पडलेली चपाती त्यानं साफ करून खाल्ली? हेही अजून समजू शकलेलं नाही. पण, त्यानं केलेलं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि आता त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या व्हिडीओनंतर आता भारतातील गरिबीवरही लोक बोलू लागले आहे.

हा व्हिडीओ सचिन कौशिक या व्यक्तिने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘ये भूख ही तो है, जो किसी से पेट भरने पर रोटी फिकवा देती है और किसी से उसी रोटी को दुबारा उठवा के धुलवा लेती है’ असे कॅप्शन दिले आहे.