25 February 2020

News Flash

Viral Video : बीबीसीच्या लाईव्ह शोदरम्यान अँकरच्या मागील बाजूस ‘तो’ पाहत होता पॉर्न

बुलेटिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बीबीसीच्या न्यूजरुमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कॅमेरामनला त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली नसली तरी काही बेरक्या प्रेक्षकांनी मात्र न्यूजरुममध्ये सुरू असलेली ही गोष्ट बरोबर हेरली

बीबीसीच्या न्यूजरुममधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर एखाद्या चॅनेलचं न्यूजरुम म्हटलं की तिथलं वातावरण थोडं गरमच असतं. बातम्या वेळेवर जाण्याचं टेन्शन, कधी एखादी ब्रेकिंग आली तर ती प्रतिस्पर्ध्याच्या आधी ब्रेक करण्याचं गडबड अशी एकंदर धावपळ येथे पाहायला मिळते. पण याहून थोडं वेगळंच चित्र बीबीसीच्या न्यूजरुममध्ये पाहायला मिळालं. बीबीसीचं दहाचं बातमीपत्र सुरू होतं. लाखो लोक ते पाहत होते. सोफी रॅवर्थ या निवेदन करत होत्या. त्या बातमी वाचत असल्या तरी त्यांच्या मागे एका कर्मचाऱ्याचे मात्र काही वेगळेच प्रताप सुरू होते.

हा कर्मचारी चक्क न्यूजरुममध्ये एका अश्लिल व्हिडिओ पाहत होता. कदाचित बीबीसीच्या न्यूजरुमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कॅमेरामनला त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली नसली तरी काही चाणाक्ष प्रेक्षकांनी मात्र न्यूजरुममध्ये सुरू असलेली ही गोष्ट बरोबर हेरली. सोफी यांच्या मागे क्रोमा नव्हता, त्यामुळे स्टुडिओतून न्यूजरुम नीट दिसत होती. तेव्हा सोफी यांच्याबरोबर मागे असलेला कर्मचारी पॉर्न क्लीप पाहतोय हे प्रेक्षकांच्या नजरेतून काही सुटलं नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या प्रकाराची एवढी चर्चा झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची चांगलीच कानउघाडणी झाली असणार हे नक्की!

First Published on August 9, 2017 5:28 pm

Web Title: one member of the bbc newsroom was caught watching porn on live show
टॅग Bbc
Next Stories
1 पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आता इस्त्रायली श्वानपथक
2 सौदी अरेबियात आता विमानातही ड्रेसकोड !
3 तुम्ही देशाचे कितवे नागरिक आहात माहितीये?
Just Now!
X