News Flash

‘त्या’ एका ट्विटमुळे कंपनीला झालं एक लाख कोटीचं नुकसान

इलॉन मस्कने ते एक ट्विट केलं अन्...

Elon Musk File Photo

टेस्ला कंपनीचा सीईओ असणारा इलॉन मस्क हा सोशल नेटवर्कींग प्रचंड सक्रीय असतो. अनेक गोष्टींवर तो या माध्यमातून व्यक्त होत असतो. सध्या अमेरिकेमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याविरोधात अनेकांनी रस्त्यावर उतरुन जबरदस्तीने व्यवहार बंद ठेवण्याला विरोध केला आहे. या मोहिमेला इलॉनने पाठिंबा दर्शवला आहे. या मोहिमेसंदर्भात नुकतेच त्याने एक ट्विट केलं होतं. त्यावरुन बराच वादही झाला होता. मात्र शुक्रवारी इलॉनने केलेल्या एका ट्विटमुळे त्यांच्या कंपनीला एक लाख कोटींचा तोटा झाला आहे.

अमेरिकेमध्ये सध्या लॉकडाउन सुरु असल्याने त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळेच अनेकजण बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम जगभरातील सर्व शेअर बाजारांवर जावणताना दिसत आहे. असं असतानाच आता इलॉनने शुक्रवारी एक ट्विट केलं. “मी माझ्या मालकीची सर्व (भौतिक) संपत्ती विकणार आहे. माझ्याकडे घरही नसेल” असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

या ट्विटनंतर अनेकांना इलॉन खरोखरच कंपनी विकाणार असल्याचे वाटले. त्यामुळेच कंपनीच्या समभागांची (शेअर्सची) किंमत पडली. अनेक गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स विकल्यामुळे कंपनीला इलॉनने ट्विट केल्यानंतर काही तासांमध्ये १४ बिलीयन डॉलर म्हणजेच अंदाज एक लाख कोटींचे नुकसान झाले. इलॉनने हे ट्विट केल्यानंतर पुढच्याच मिनिटाला ‘टेस्लाचे शेअर्सची किंमत वधारी आहे,’ असं ट्विट केलं होतं. मात्र इलॉनच्या आधीच्या ट्विटमुळे घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या मालकीचे समभाग विकून टाकले.

अनेकांनी इलॉनच्या ट्विटनंतर कंपनीचे शेअर्सची किंमत कशाप्रकारे पडली याबद्दलचे ट्विट केलं आहे.

अनेकांनी इलॉनच्या या एका ट्विटमुळे आपल्याला मोठं नुकसान झाल्याचं रिप्लाय करुन सांगितलं आहे. पाहा लोकांचं नक्की काय म्हणणं आहे.

माझं एवढं नुकसान झालं.

हॅक झालयं का अकाऊंट?

कंपनी खड्ड्यात

शेअर्सची किंमत पडली

आधी आणि नंतर

असं काहीतरी झालं

याचा परिणाम?

इलॉनने या पूर्वीही अशी ट्विट केल्याने त्याचा कंपनीला फटका बसल्याची उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने लॉकडाउनला विरोध करणाऱ्यांना समर्थन दर्शवलं होतं. त्याने ‘फ्री अमेरिका नाऊ’ म्हणजेच अमेरिकेला लॉकडाउनमधून मुक्त कसा अशा अर्थाचं ट्विट केलं होतं.

या ट्विटवरुनही दोन गट पडल्याचे पहायला मिळालं होतं. एकंदरितच इलॉनच्या एका अती उत्साहात केलेल्या ट्विटमुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 4:34 pm

Web Title: one tweet by elon musk just wiped rs 1 lakh crore from teslas market value scsg 91
Next Stories
1 Video : ‘सिमेंट-मिक्सर ट्रक’मध्ये लपून जाणारे १८ मजूर पोलिसांच्या ताब्यात, FIR दाखल
2 बिल गेट्स यांनी विकत घेतला ३२८ कोटींचा आलिशान बंगला, फोटो पाहून थक्क व्हाल
3 करोनंतरचं जग… हॉटेल आणि रेस्तराँमध्ये दिसणार ‘हे’ मुख्य बदल
Just Now!
X