News Flash

वायरशिवाय चार्ज होणार OnePlus 8 Pro !

सध्या स्मार्टफोन कंपन्या अद्ययावत तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन लाँच करतायेत...

(व्हायरल फोटो)

सध्या स्मार्टफोन कंपन्या अद्ययावत तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन लाँच करतायेत. यातीलच एक म्हणजे वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी. वनप्लस कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 8 Pro मध्येही वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळण्याची दाट शक्यता आहे.

ट्विटरवर सध्या OnePlus 8 Pro चा एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोवरुन वनप्लस 8 प्रो वायरलेस चार्जिंग टेक्नॉलजीसह दाखल होणार असल्याची चर्चा रंगलीये. जो फोटो व्हायरल होतोय त्यात एका वायरलेस चार्जिंग पॅडवर फोन दिसत आहे. त्यासोबत ‘charge like a pro’ असा मेसेज या पोस्टसोबत लिहिलाय. वनप्लस या चार्जिंग टेक्नॉलॉजीवर गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे, त्यामुळे आता कंपनी नव्या तंत्रज्ञानासाठी तयार असल्याचं मानलं जातंय. तसेच व्हायरल होणारा फोटो खऱ्या वनप्लस 8 प्रोचा नसल्याचंही बोललं जातंय. शाओमी आणि ओप्पो या कंपन्यांकडे ही टेक्नॉलॉजी आधीपासूनच आहे.

काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स –
6.65 इंचाचा फ्लुइड डिस्प्ले किंवा CAD रेंडर्सनुसार पंच होल आणि कर्व्ड AMOLED डिस्प्ले
सेल्फी कॅमेरासाठी दिलेला पंच होल डिस्प्लेमध्ये वरती लेफ्ट साईडला
प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट
64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप
सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मोगापिक्सलचा कॅमेरा
12जीबीपर्यंत रॅम आणि 256जीबी इंटर्नल स्टोरेज
बॅटरी 4500mAh असू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 3:55 pm

Web Title: oneplus 8 pro may have a feature no oneplus phone has ever had before sas 89
Next Stories
1 Huawei Band 4 भारतात लाँच; किंमत 1,999 रुपये
2 रतन टाटा यांनी पोस्ट केला तरुणपणीचा फोटो, नेटकऱ्यांचा बसेना विश्वास
3 मनसेने झेंड्यावर वापरलेल्या शिवमुद्रेचा अर्थ काय ?
Just Now!
X