News Flash

…म्हणून या शहरात राहतात केवळ ४ माणसे

निसर्गरम्य ठिकाणाला पर्यटक देतात भेट

भारतातील एखाद्या शहराची लोकसंख्या विचारली की ती ऐकून आपणही अनेकदा थक्क होतो. मग लोकसंख्या वाढल्याच्या चर्चा सुरु होतात आणि ती कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याचे उपायही सुचविण्यात येतात. लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्यांमुळे हैराण झालेले अनेक जण परदेशातही जाणे पसंत करतात. एकीकडे भारत आणि चीनमध्ये हे चित्र असताना परदेशात अनेक ठिकाणी लोकसंख्या कमी असल्याने ती वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र आता एक गोष्ट ऐकून तुम्ही नक्कीच थक्क होणार आहात. कारण कॅनडातील एका शहरात केवळ ४ व्यक्ती राहतात.

ही गोष्ट तुम्हाला नक्कीच खरी वाटणार नाही. मात्र असं ठिकाण खरंच प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे. या शहराचं नाव आहे टिल्ट कोव. आता चारच लोक राहतात म्हटल्यावर या शहरात काहीच विशेष सुविधा नसतील असं आपल्यातील अनेकांना सहाजिकच वाटलं असेल. पण याठिकाणी पोस्ट ऑफिसपासून ते अगदी म्युझियमपर्यंत सगळं काही आहे. आता हे चार जणही या शहरात का राहतात तर त्यांना या जागेची देखभाल करावी लागते.

एकेकाळी हे शहर गजबजलेलं होतं. पण १९६७ नंतर याठिकाणच्या खाणउद्योगावर संकट कोसळलं. त्यामुळे लोक शहर सोडून दुस-या शहराच्या शोधात निघाले आणि टिल्ट कोव ओस पडू लागलं. सध्या या ठिकाणी लोक नसले तरी शहराची भौतिक रचना मात्र जशीच्या तशी राहिली आहे. त्यामुळे उत्सुकतेपोटी या शांत शहरालाही दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. विशेष म्हणजे डिसेंबर ते जानेवारीच्या सीझनमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ पहायला मिळतो. हे ठिकाण टोरांटोपासून रस्त्याने दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे काही निमित्ताने तुम्ही कॅनडामध्ये गेलात तर या ठिकाणी नक्की जाऊन या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 11:00 am

Web Title: only 4 people live in tilt cove in canada
Next Stories
1 Viral Video : फेडररपुढे महिला टेनिसपटूंचं चालेना, व्हिडिओ व्हायरल
2 नेतान्याहू यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कचऱ्याचे डब्बे उलटे केले
3 धावपट्टीवर घसरलेले विमान दरीच्या टोकावर अडकले
Just Now!
X