21 November 2017

News Flash

VIRAL : या फोटोतला घोळ लक्षात आला का?

तिनं झाड हातात का घेतलंय हेच कळत नाहीय

मुंबई | Updated: August 18, 2017 10:54 AM

‘दिसंत तसं नसतं, म्हणून जग फसतं…’ असं म्हणतात. या फोटोबाबतही तेच म्हणावं लागेल. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. फोटो पाहताक्षणी तो का व्हायरल होतोय, याचा बऱ्यापैकी अंदाज तुम्हाला आला असेल. फोटोत एक जोडपं दिसतंय आणि त्यातल्या महिलेनं झाड उचलल्याचं दिसतंय ना!

आता कोणी हातात झाड वगैरे घेऊन फोटो का काढेल? असा प्रश्न हा फोटो पाहून कुणालाही पडेल. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत नेटकऱ्यांना कुतूहल वाटणं स्वाभाविकच आहे. ज्यानं हा फोटो अपलोड केला त्याच्यावर अर्थात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. झाड हातात घेऊन उभं राहण्याचं कारणही त्याला अनेकांनी विचारलं, पण नंतर मात्र या फोटोमधला घोळ अनेकांच्या लक्षात आला. काय मग या फोटोमधला घोळ तुमच्याही लक्षात आला का?

या फोटोमध्ये नक्की काय घोळ आहे हे बघताय का? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं का? नसेल तर टेन्शन घेऊ नका. आम्ही सांगतो! या फोटोतील महिलेनं झाड उचललेलं नाही. हे झाड तिच्या पाठीमागे आहे. पण ऑप्टिकल इल्युशनमुळे तिनं झाड उचलल्याचा भास बघणाऱ्याला होतो.

First Published on August 18, 2017 10:54 am

Web Title: optical illusion photo of couple has made internet confused