25 March 2019

News Flash

Viral Video : धक्कादायक! प्राणी संग्रहालयातला ओरांगुटान ओढतोय सिगारेट

व्हिडिओ व्हायरल होत आहे

पर्यटकाचं अनुकरण करत सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर इंडोनेशियातल्या प्राणी संग्रहालयातला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होण्याचं कारण म्हणजे या प्राणी संग्रहालयातला ओरांगुटान सिगारेट ओढताना कॅमेरात कैद झाला आहे. नकळत या प्राण्यानं संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकाचं अनुकरण करत सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला. बांडुंग संग्रहालयात हा प्रकार घडला आहे. प्राणीप्रेमी मारिसॉन गुचिआनो यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकानेच ओरांगुटानला सिगारेट ओढायला दिली असल्याचं गुचिआनो यांचं म्हणणं आहे. अनेकदा संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना कसं वागवं याची माहिती नसते. कधी कधी आपल्याकडून या मुक्या जिवांना त्रास होतोय याची साधी जाणीवही त्यांना नसते. त्याचप्रमाणे संग्रहालयात असणारे सुरक्षा रक्षकही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात असंही ते म्हणाले. पण याचा परिणाम प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांच्या आरोग्यावर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

First Published on March 8, 2018 6:40 pm

Web Title: orangutan smokes a cigarette on camera in indonesia