News Flash

बेंगळुरुमधल्या युजरने दिली ऑर्डर, ‘स्विगी’ म्हणाले राजस्थानमधून करणार पिकअप

युझर आणि पार्सल पिकअप करणाऱ्या हॉटेलमधील अंतर सव्वा दोन हजार किलोमीटरहून अधिक

'स्विगी'ने घातला गोंधळ

भूक लागल्यावर झटपट खाणे मागवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे फूड अॅप्स. आज अनेक फूड अॅप्स उपलब्ध असून प्रत्येक अॅपचे काही ना काही वेगळेपण आहे. भन्नाट ऑफर्स आणि भरपूर पर्यायांमुळे ही अॅप्स तरुणांच्या पसंतीस पडताना दिसते. मात्र कधीकधी अॅपच्या माध्यमातून मागवलेले खाणे पोहचवताना डिलेव्हरी करणाऱ्यांचा गोंधळ होतो. त्यामुळे कधी खाणे पोहचण्यासाठी खूप उशीर होतो तर कधी ऑर्डर केलेल्या पदर्थाऐवजी भलताच पदार्थ घेऊन डिलेव्हरी बॉय दारात उभा असतो. पण अशाप्रकारची गफलत वारंवार होऊन नये म्हणून या अॅप्सच्या कंपन्या काळजी घेतात. तरी प्रत्येक वेळेस चूक टाळता येतेच असं नाही. अशाच प्रकारचा स्विगीचा किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बेंगळुरुमधील युजरने दिलेली ऑर्डर स्वीगीने चक्क राजस्थानमधील एका हॉटेलमधून पिकअप केली.

तुम्हाला हा विनोद वाटत असेल पण ट्विवटरवरील भार्गव राजन या युझरने स्विगी अॅपवरील या प्रकाराचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. बेंगळुरुमधील व्यक्तीने जवळच्या हॉटेलमधून ऑर्डर दिली. मात्र अॅपने याच नावाच्या राजस्थानमधील हॉटेलमधून ऑर्डर पीकअप करुन पोहचवली जाईल असं सांगत हॉटेल आणि युजरच्या लोकेशनचा नकाशाच दाखवला.

हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे काही हजार किलोमीटरवर जी ऑर्डर स्विगीकडून डिलिव्हर करण्यात येणार होती ती केवळ १३८ रुपयांची होती.

मात्र स्विगीच्या औपचारिक ट्विटर अकाऊण्टवरून या ट्विटला मजेशीर उत्तर देण्यात आले. ‘आम्ही आमच्या ग्राहकांसाठी चंद्रावरही जाऊ’ असं मजेदार ट्विट करतानाच स्विगीने संबंधित प्रकरणात लक्ष घालून ते सोडवले जाईल असं सांगितलं.

स्विगीने भार्गवला दिलेल्या रिप्लायमध्ये आमच्याकडून काहीतरी गोंधळ झाल्याचे दिसत आहे. आम्ही लवकरच यावर तोडगा काढू आणि भविष्यात अशा चूका होणार नाही याची काळजी घेऊ असं स्विगीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

स्विगीने आपली चूक मान्य केली असली तरी हा काही हजार किलोमीटरचा प्रवास करुन येणारी ऑर्डर पाहून नेटकऱ्यांचे चांगले मनोरंजन झाले हे मात्र नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 4:21 pm

Web Title: orders food in bengaluru swiggy picks it up from a restaurant in rajasthan
Next Stories
1 दुधवाल्यांच्या मदतीने मराठमोळा तरुण थेट पोहोचला फोर्ब्सच्या यादीत
2 सँडविच चोरी केल्याने खासदाराला द्यावा लागला राजीनामा
3 गोवा : ‘हा बागा बिचचा रस्ता नाही, गुगल मॅप गंडलंय’
Just Now!
X