News Flash

८० टक्के भारतीय कर्मचारी बॉसपेक्षा जास्त काम करतात

२१ ते २४ वयोगटातले कर्मचारी १२- १२ तास मेहनत करतात

टलेंटएजच्या सर्व्हेक्षणानुसार १९८० ते २००० या काळात जन्माला आलेले ८० टक्के कर्मचारी हे त्यांच्या बॉसपेक्षा जास्त काम करतात.

”ही ‘बॉस’ नावाची कटकट. धड ऑफिसमध्येही जगू देत नाही ना घरी.” , ”या बॉसचं ना काहीतरी केलं पाहिजे.” ” माझा बॉस ना अतिशय वाईट आहे” अशा तक्रारी आपण एकमेकांना करत असोतच. यात नवीन ते काय? ”आपण ऑफिसमध्ये राब राब राबतो, दहा बारा तास मेहनत करतो पण या बॉसला मात्र आपण काहीच काम करत नाही असंच वाटतं.” तुमच्याही डोक्यात असेच काहीसे विचार असतील तर हे सर्व्हेक्षण नक्कीच वाचा. ‘टलेंटएज’ने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार ८० टक्के भारतीय कर्मचारी त्यांच्या बॉसपेक्षाही जास्त मेहनती असल्याचे समोर आले आहे.

वाचा : २६ व्या वर्षी अब्जाधीश!!

वाचा : भारतातल्या १% गर्भश्रीमंतांकडे देशातली ५८% संपत्ती..

टलेंटएजच्या सर्व्हेक्षणानुसार १९८० ते २००० या काळात जन्माला आलेले ८० टक्के कर्मचारी हे त्यांच्या बॉसपेक्षा जास्त काम करतात. दिल्लीतल्या या कंपनीने गेल्या आठवड्यातच आपले सर्व्हेक्षण जगासमोर आणले. या सर्व्हेक्षणानुसार २१ ते २४ वयोगटातले जवळपास १६ टक्के कर्मचारी हे दिवसातले १२ तास झोकून काम करतात. सोशल मीडिया, फोन कॉल, प्रत्यक्ष संवाद साधून देशभरातील ८ मेट्रो शहरातील प्रोफेशनल्सची संवाद साधण्यात आला, यावरून हे स्पष्ट झाले आहे. बॉसच्या कितीही मनात नसले तरी या आपल्याला मेहनतीसाठी पगारवाढ मिळाली पाहिजे असेही ८७ % कर्मचा-यांना वाटत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. १ हजार तरुण कर्मचा-यांनी यात सहभाग घेतला होता. मग आता बॉस जर तुम्ही काहिच काम करत नाही असं ओरडला तर त्याला हे सर्व्हेक्षण नक्की वाचायला द्या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:21 pm

Web Title: over 80 per cent of indian worker work harder than their bosses
Next Stories
1 ‘मोठ्या’ लोकांच्या ‘थोर’ चुका
2 रोजगार हिसकावून घेणा-या रोबोटवर टॅक्स लावला पाहिजे- बिल गेट्स
3 हे कुटुंब खरोखर राहत होतं ‘काळाच्या ४० वर्ष मागे’
Just Now!
X