समुद्रात वाहून जाणारी कार चालक वाचवण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, युकेमधील ली डॉल्बी यांनी हा व्हिडीओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला असून व्हिडीओत व्यक्ती समुद्रात वाहून चाललेली आपली कार वाचवण्यासाटी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. चालकाने किनाऱ्यापासून जवळच कार पार्क केली होती. यावेळी जोरदार लाटा असल्याने कार समुद्रात वाहून गेली.

व्हिडीओ शूट करताना ली डॉल्बी सांगत आहेत की, या व्यक्तीन जेट स्काय गाडीतून बाहेर काढण्यासाठी कार किनाऱ्यापासून जवळच पार्क केली होती. त्याने आपली कार गमावली आहे असंही बोलताना त्या ऐकू येत आहेत. यावेळी तिथे उपस्थित एक तरुण कार बाहेर काढण्यासाठी मदत करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, कार समुद्राबाहेर काढण्यात चालकाला यश मिळालं. बीचवर उपस्थित एका तरुणाने मोठा दोर आणला, ज्याच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात मदत मिळाली. महाराष्ट्रातही एक अशीच घटना गतवर्षी घडली होती. किनाऱ्यावर उभी केलेली कार लाटांनी खेचल्याने समुद्रात वाहून गेली होती.