गेल्या वर्षभरात करोनाच्या संकटामुळे जगभरातल्या मोठमोठ्या अर्थव्यवस्थांना हादरे दिले आहेत. अनेक अर्थव्यवस्थांनी मोठ्या घसरणींचा सामना देखील केला आहे. यातून जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकाही सुटली नाही. अजूनही करोनामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट कमी झालेलं नाही. मात्र, याचा कोणताही परिणाम जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या पेंटिंगच्या लोकप्रियतेवर झालेला नाही. नुकत्याच झालेल्या एका लिलावातून ही बाब स्पष्ट झाली आहे. कारण पिकासो यांच्या ‘Women Sitting Near a Window (Marie-Therese)’ या पेंटिंगची तब्बल १० कोटी ३० लाख अमरिकी डॉलर अर्थात भारतीय चलनात जवळपास ७५५ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये हा लिलाव पार पडला.

pablo picasso women sitting near a window painting (AP Photo/Alastair Grant, File)
पिकासो यांचं हेच ते पेंटिंग! (फोटो सौजन्य – एपी फोटो/एलस्टेर ग्रांट)

८९ वर्षांपूर्वीचं पेंटिंग!

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो यांनी १९३२ साली हे पेंटिंग पूर्ण केलं होतं. त्यांची शिक्षिका मारी थेरेसा वॉल्टर हिचं हे पेंटिंग आहे. अवघ्या ८ वर्षांपूर्वी लंडनमध्ये या पेंटिंगचा ४५ मिलियन डॉलर्सला लिलाव झाला होता. ८ वर्षांत या पेंटिंगला गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये दुपटीहून जास्त किंमत मिळाली आहे. आता पिकासो यांच्या एकूण ५ पेंटिंग्जला १० कोटी डॉलर्सहून जास्त किंमत मिळाली आहे. जगभरात होणाऱ्या लिलावांमध्ये पिकासो यांच्या पेंटिंग्जची कोट्यवधींना विक्री होत असते.

तेरा मुझसे है पहले का नाता कोई… मरणासन्न आईसाठी व्हिडीओ कॉलवर मुलानं गायलं गाणं, डॉक्टरलाही अश्रू अनावर

पिकासोंच्या चित्रांची मोहिनी!

पाब्लो पिकासो यांचा जन्म २५ ऑक्टोबर १८८१ रोजी स्पेनमध्ये झाला होता. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ फ्रान्समध्ये घालवला. स्पेनमधील नागरी युद्धादरम्यान झालेल्या प्रचंड संहाराची त्यांनी काढलेली चित्रे जगभरात नावाजली गेली. याशिवाय पिकासो यांनी काढलेल्या असंख्य चित्रांनी जगभरातल्या चित्रप्रेमींवर मोहिनी घातली आहे. ८ एप्रिल १९७३ रोजी पिकासो यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे फ्रान्समधल्याच त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला. पण आयुष्यभर त्यांनी काढलेल्या असंख्य चित्रांच्या रुपाने पिकासो लाखो-करोडो चित्रप्रेमींच्या मनात अजरामर झाले.