गंभीर गुन्ह्याखाली एखाद्याला फाशीची शिक्षा झालेली अनेकदा आपण पाहिली आहे, पण पाकिस्तानमध्ये जरा अजबच प्रकार दिसला. इथे एका मुलावर हल्ला केला म्हणून चक्क कुत्र्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात हा अजब प्रकार घडला आहे. इथले सहायक आयुक्त राजा सलीम महाशयांनी कुत्र्याला फाशीची शिक्षा सुनावली. आता कुत्र्याचा गुन्हा एवढाच की तो लहान मुलाला चावला. तेव्हा या कुत्र्यावर जीवे मारण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यानुसार त्याला फासावर देखील चढवण्यात येणार आहे.

लहान मुलाच्या कुटुंबियांना कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. तेव्हा इथल्या आयुक्ताने तर त्याला थेट फाशीच सुनावली. आता बिचाऱ्या कुत्र्याच्या मालकाने त्याच्या सुटकेसाठी आयुक्तांकडे अपिल केलं आहे. या मुक्या प्राण्याला फाशीची शिक्षा देणं चुकीचं आहे. फार फार तर त्याला काही दिवसांसाठी तुरुंगात डांबा अशी विनंती त्याने केली आहे. जर आयुक्त ऐकले तर ठिक नाहीतर कुत्र्याला फाशी वगैरे देण्याचा हा जगातला दुर्मिळच प्रकार असेल नाही का?