विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना सहज खिशात घातला. या विजयाबरोबरच विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धाच्या विजयाची मालिका भारताने रविवारीही कायम राखली. रोहित शर्मा, विराट कोहली यांची दमदार फलंदाजी तर कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार ८९ धावांनी हरवले. विराटचे नेतृत्वाखाली पाकिस्तानवर विश्वचषकात भारताने मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला. तर दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदचे कोणतेच डावपेच मैदानात काम करताना दिसत नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही सरफराज आपल्या नेतृत्व गुणांनी आणि फलंदाजीने प्रेक्षकांवर छाप पाडण्यास अपयशी ठरला. यामुळेच सामना संपल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकांनी ‘ए जाड्या… ए जाड्या’ म्हणत सरफराजची चेष्ठा केली. सोशल नेटवर्किंगवरी अनेकांनी सरफराजला चांगलाच फैलावर घेतला आहे.

पावसाचा अंदाज असल्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडण्याचा निर्णय सरफराजने घेतला. पावसाळी वातावरण असल्याने पीचवर चेंडू वळेल अशी अपेक्षा असल्याने हा निर्णय सरफराजने घेतल्याचे बोलले जात होते. मात्र सरफराजचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचे दिसले. भारतीय सलमीवीरांनी शतकी भागीदारी केली. त्यानंतरही गोलंदाजीमधील बदल करण्यात तो अयशस्वी ठरला. तसेच सामन्यादरम्यान कॅमेरामनने सरफराजला आळस देताना कॅमेरात टिपले. त्यावरुन त्याच्यावर सोशल मिडियावर टिका झाली. पाकिस्तानी संघ ३३६ धावांचा पाठलाग करताना फलंदाजीस आलेल्या सरफराजने ३० चेंडूंमध्ये अवघ्या १२ धावा करुन बाद झाला. आपल्या कर्णधाराच्या या कामगिरीने संतापलेल्या काही प्रेक्षकांनी सामना संपल्यानंतर मैदानातच सरफराजला ‘जाड्या’ म्हणत हिणवले. सामना संपल्यानंतर सरफराज मैदानामध्ये उभा राहून संघाच्या प्रशिक्षकांशी बोलत असताना काही पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला पाहून ‘ए जाड्या.. ए जाड्या’ अशी शेरेबाजी केली. तसेच या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनी सरफराजला ‘नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी का केली नाही?’ असा सवालही विचारला आहे. अर्थात बऱ्याच अंतरावरुन ही शेरेबाजी सुरु असल्याने ती सरफराजने ऐकली नाही असेच या व्हिडिओत दिसत आहेत.

मैदानाबरोबरच ऑनलाइन माध्यमांवरुनही अनेकांनी सरफराजवर निशाणा साधला. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विटस

१)
सामन्याचे वर्णन थोडक्यात

२)
सरफराज धोका देणार आधीच सांगितलं होतं

३)
माझंही तेच उत्तर आहे

४)
भारताचा गेम प्लॅन यशस्वी

५)
पाकिस्तानी खेळाडूंचा नवा लोगो

दरम्यान, सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सरफराजने पाकिस्तान संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर घराब कामगिरी करत असल्याने पाकिस्तानचा पराभव झाल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतरही अनेकांनी सरफराजला ट्रोल केले होते.