31 October 2020

News Flash

शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न! नेटकऱ्यांनी दिला हा सल्ला..

नेटकऱ्यांनी शाहीद आफ्रिदीला विविध खोचक सल्ले दिले आहेत

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याला पाचवी मुलगी झाली. त्याने आपल्या मुलींसह पाचव्या मुलीचा फोटो ट्विटरवर ट्विट केला. आपल्याला पाचवी मुलगी झाल्याने आपण आनंदी आहोत असं शाहीदने म्हटलं आहे. मात्र सोशल मीडियावर त्याची चांगलीच फिरकी घेण्यात येते आहे. अनेकांनी त्याला कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. तर काहींनी अरे बायकोचा थोडासा विचार कर असाही खोचक सल्ला दिला आहे.

 

ट्विटमध्ये काय म्हटलं आहे शाहीदने?
अल्लाहच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला चार मुली आहेत. आता पाचवीही मुलगी झाली आहे. मी तिचा फोटो शेअर करतो आहे. पाचवीही मुलगी झाल्याचा मला आनंद होतो आहे. माझ्या चाहत्यांना ही बातमी मी फोटोद्वारे देतो आहे. #FourbecomeFive असंही त्याने लिहिलं आहे. तसंच आपल्या मुलींसोबतचा फोटो शाहीदने ट्विटरवर शेअर केला आहे.

१२ तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोला ५ हजारांवर रिट्विट्स मिळाले आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त लाईक्सही आले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी शाहीद आफ्रिदीला सल्ले देत त्याच्यावर टीका केली आहे. ट्विटर इंडियावरही Afrdi हा ट्रेंड चांगलाच चालतो आहे.

‘शाहीद आफ्रिदी तुला क्रिकेट टीम तयार करायची आहे का? निरक्षर कुठला!’ ‘बास्केटबॉलची टीम तर झाली आता क्रिकेटची टीम बनावयाची आहे का?’ ‘तुला कुटुंब नियोजनाची गरज आहे’ असे सल्ले देत आफ्रिदीला ट्विटरवर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 10:30 am

Web Title: pakistan cricketer shahid afridi shares his 5th daughters photo on twitter and trolled by netizens scj 81
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईची सामन्यावर मजबूत पकड
2 हंगामाच्या अखेरीस सलामीवीरांचा उदय!
3 भारत-न्यूझीलंड  सराव सामना : मयांक, पृथ्वी, शुभमन अपयशी
Just Now!
X