04 March 2021

News Flash

#ImranKhan : या वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत राहिले इम्रान खान

जाणून घ्या माजी क्रिकेटपटू आणि नेत्याच्या ट्रोलिंगमागची कारणे

पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदान पार पडले. याच्या मतमोजणीचे कल तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे इम्रान खान यांच्या बाजूने असल्याची स्थिती काही वेळापूर्वी होती. माजी क्रिकेटपटू असलेले इम्रान खान हे कायमच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आता निवडणूकीमुळे चर्चेत असलेले इम्रान खान यांच्याबाबत कधी त्यांच्या लग्नावरुन तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरुन चर्चा होताना दिसते. पाहूयात मागील काही महिन्यात इम्रान खान यांना कोणत्या गोष्टींवरुन ट्रोल केले गेले.

शंकराच्या रुपातील फोटो

पाकिस्तानच्या सोशल मीडियामध्ये एप्रिल महिन्यात इम्रान खान यांचा भगवान शंकराच्या रूपातला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंनी याचा निषेध केला होता. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या राजकारणातही या गोष्टीवरुन मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. सामान्य नागरिकांपालून ते संसदेपर्यंत सर्व ठिकाणी या फोटोवरुन मोठ्या प्रमाणात टिका होत होती.

तिसऱ्या लग्लाच्या फोटोवरुन झाले ट्रोल

इम्रान खान यांनी तिसरे लग्न अध्यात्मिक गुरु बुशरा मनेकाशी करण्याचे जाहीर केले. त्यानंतर सोशल मीडियावर या लग्नाचे फोटोही शेअर करण्यात आले. इम्रान यांनी जानेवारी महिन्यात बुशरासमोर निकाहचा प्रस्ताव मांडला तिनं तो स्वीकारलाही. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो येताच त्यावर नेटकऱ्यांनी अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिल्या देत त्यांना ट्रोल केल होते.

वैवाहिक आयुष्याबाबत झाल्या जोरदार चर्चा

इम्रान खान यांनी तिसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानंतर त्यांची तिसरी पत्नी रेहम खान हीने त्यांच्या चारित्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आमचं लग्न झालं असतानाही या दोघांचे संबध होते त्यामुळे तो बाहेरख्यालीच आहे असे रेहम खान हिने म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतच्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या होत्या.

अजब कारण देत तिसऱ्याही बायकोनी दिले सोडून

इम्रान खान यांनी अध्यात्मिक गुरु बुशरा मनेकशी लग्न केल्याचे जाहीर करत सोशल मीडियावर या लग्नाचे फोटोही शेअर केले होते. तिसरं लग्न असल्याने सोशल मीडियावर त्यावेळी बरीच चर्चाही रंगली होती. पण या दोघांमध्ये घरातील कुत्र्यावरुन भांडण झाले होते. आपल्या अध्यात्मिक कामात हे कुत्रे व्यत्यय आणत असल्याचे तिसरी पत्नी रहेम खान हिने केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 2:46 pm

Web Title: pakistan election imran khan go viral on social media because of some things in last month
Next Stories
1 Royal Enfield ची Pegasus अवघ्या तीन मिनिटांतच ‘आउट ऑफ स्टॉक’
2 Viral Video : पुरामुळे कॉटवरून रुग्णालयात न्यावं लागलं गर्भवतीला
3 इम्रान खानऐवजी BBC Newsnight कडून वासिम अक्रमचा फोटो ट्विट, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Just Now!
X