डोरेमॉन हे लहानग्यांमध्ये प्रसिद्ध असणारे जॅपनीज कार्टून आहे. अनेकांचे तर हे पंजाबमधील आमदारांनी केली आहे. या कार्टूनचा लहान मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याने या बंदीची पाकिस्तानी आमदारांनी केली आहे. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे आमदार डॉ. मुराद रास यांनी ही मागणी केली. त्यांनी पाकिस्तानमधील पंजाब विधानसभेत हा प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानमध्ये डोरेमॉन या कार्टूनवर बंदी असताना काही केबलचालक आणि टीव्ही चॅनल्स हे कार्टून दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या लोकांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचेही ते म्हणाले.

लहान मुले हे डोरेमॉनसारख्या कार्टूनचे अगदी सहज बळी पडतात. हे कार्टून आकर्षक असून त्याची कथाही लहान मुलांना भावणारी अशी आहे. तसेच त्यासाठी वापरला जाणारा आवाजही लहानग्यांना खिळवून ठेवाणारा आहे. मात्र हे कार्टून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि मानसिकतेवर चुकीचा परिणाम करत असल्याने ते पूर्णपणे बंद करावे. या कार्टूनमध्ये वापरली जाणारी भाषाही अतिशय नकारात्मक असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानातील स्थानिक निर्मिती संस्थाही अशा पद्धतीच्या कार्टून सीरिजची निर्मिती करतात. त्यामुळे परदेशी कार्टून सीरिजऐवजी स्थानिक कलाकारांना यामध्ये जास्त प्राधान्य आणि संधी उपलब्ध करुन दिल्यास देशाच्या दृष्टीनेही ते फायदेशीर ठरेल.