पाकिस्तानमधील नेटकरी सोशल नेटवर्किंगवर कायमच चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा सोशल नेटवर्किंगवर पाकिस्तानमधील मजेदार व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. तर कधी तेथील नेत्यांनी केलेल्या मजेदार ट्विटसच्या बातम्या पहायला मिळतात. अशीच एक चर्चा सध्या नेटवर सुरु आहे ती पाकिस्तानमधील नेते खुर्रम नवाज गंदपूर यांची. खुर्राम यांनी एका विमान उड्डाण घेतानाचा व्हिडिओ ट्विट केला असून त्यामध्ये त्यांनी वैमानिकाचे कौतुक केले आहे. मात्र हा व्हिडिओ खरा नसून लोकप्रिय व्हिडिओ गेम असणाऱ्या ‘गॅण्ड थिफ्ट ऑटो फाइव्ह’मधील (जीटीए) असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच नेटकरी खुर्रम यांना चांगलेच ट्रोल करत आहेत.

खुर्रम यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक विमान टेक ऑफ घेताना दिसत आहे. मात्र हे विमान टेक ऑफ घेताना रन वे वर अचानक एक तेलाचा टँकर येतो. या टँकरला धडकण्याआधी अवघ्या काही फुटांच्या अंतरावरुन विमान टेक ऑफ घेताना दिसते. हा व्हिडिओ खरं तर जीटीए या गेममधील आहे. मात्र खुर्रम यांना हा व्हिडिओ खरा वाटला. त्यांनी तो ट्विट केला. ‘हे विमान थोडक्यात बचावले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने अपघात टळला,’ असं खुर्रम यांनी हा व्हिडिओ ट्विट करता म्हटलं होतं.


खुर्रम यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी हा व्हिडिओ गेममधील असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ…

आपली चूक लक्षात आल्यानंतर ‘पाकिस्तान आवामी तेहरीन’ पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्या खुर्रम यांनी ट्विट डिलीट केले. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले होते. अनेकांनी खुर्रम यांची या ट्विटवरुन खिल्ली उडवली आहे. पाहुयात काही कमेंट

खरंच यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे

जेव्हा ग्राफिक्स म्हणजे काय तुम्हाला ठाऊक नसतं

खुर्रम यांनी हे ट्विट डिलीट केले असले तरी यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देणारे किंवा त्यांच्यावर होणाऱ्या टिकेला उत्तर देणारे कोणतेही ट्विट केलेले नाही.