01 March 2021

News Flash

पाकिस्तानच्या महिला मंत्रीच इम्रान खान यांच्यावर फिदा, म्हणाल्या….

पाकिस्तानच्या एक महिला मंत्र्याला मात्र इम्रान खान यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. ही महिला मंत्री इम्रान खान यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात आहे.

ढासळती अर्थव्यवस्था, दहशतवाद या मुद्यांवरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. पण पाकिस्तानच्या एक महिला मंत्र्याला मात्र इम्रान खान यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. ही महिला मंत्री इम्रान खान यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात आहे.

ती इम्रान खान यांचे कौतुक करताना थकत नाहीय. इम्रान खान यांचे कौतुक करतानाचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होतोय. झरताज गुल वंझीर असे या महिला मंत्र्याचे नाव आहे. इम्रान सरकारमध्ये त्या पर्यावरण राज्यमंत्री आहेत.

झरताज गुल वंझीर काय म्हणाल्या?
इम्रान खान करिष्माई व्यक्तिमत्वाचे नेते आहेत. आपल्या हास्यानेच ते समोरच्याला जिंकून घेतात. “इम्रान खान यांच्या देहबोलीबद्दल आपण बोलत असू तर, त्यातून त्यांचे करिष्माई व्यक्तिमत्व दिसते” झरताज गुल वंझीर यांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

“इम्रान खान ज्या पद्धतीने चालतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वास अधिकार आणि दबदबा दिसतो. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांना पाहूनच त्या शंकांचे निरसन होते” असे झरताज गुल वंझीर म्हणाल्या. या व्हिडीओवरुन झरताज गुल वंझीर सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर ट्रोलही होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 4:24 pm

Web Title: pakistan minister zartaj gul all praise pm imran khan for smile personality dmp 82
Next Stories
1 viral memes : दूरदर्शनचा भाव वाढला; हे पहा भन्नाट मीम्स
2 नवव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतरही महिला उठून चालू लागली, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
3 10 वर्षाच्या मुलामुळे 13 वर्षांची मुलगी झाली गरोदर, डॉक्टरही हैराण; TV शोमध्ये सांगितली घटना
Just Now!
X