पाकिस्तानला आपल्या अंतर्गत प्रश्नांपेक्षा काश्मीरचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. जम्मू काश्मीर आणि कलम 370 वर पाकिस्तानमधील एका टिव्ही चॅनलावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या शोचं लाइव्ह टेलिकास्टही सुरू होतं. पाकिस्तानी विश्लेषकाने यादरम्यान आपलं मत व्यक्त करणं सुरू केलं आणि त्याचवेळी ते आपल्या खुर्चीवरून खाली पडले. यादरम्यान शोचा अँकरदेखील त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्यातच हा प्रोग्राम लाइव्ह सुरू असल्याने याचा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. कोणी त्यांना टप्प्याटप्प्याने पडत आहात का असं विचारलं तर कोणी ती खुर्ची चीनची होती का असा सवाल केला आहे. असं पहिल्यांदाच झालं नाही जेव्हा पाकिस्तानमधील कोणत्या लाइव्ह शोचा व्हिडिओ असा व्हायरल झाला.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या बैठकीचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या पक्षाच्या बैठकीचं फेसबुकवरून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येत होतं. याचदरम्यान एका मंत्र्याच्या डोक्यावर कॅट फिल्टर लागल्याचं पहायला मिळालं होतं.