20 November 2019

News Flash

VIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर

दुबईमधील क्रिकेटच्या मैदानात गणपती बाप्पाचा मोरयाचा जयघोष...

व्हिडीओ झाला व्हायरल

भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर आठ गडी राखून विजय मिळवला. हा सामना संपून १२ तासांहून अधिक काळ झाला आहे तरी सोशल नेटवर्किंगवर या सामन्याबद्दलची चर्चा काही संपताना दिसत नाहीय. पाकिस्तानी संघाला भारतीय संघाने ट्रोल करण्यापासून ते अभिनंदानाच्या पोस्ट अजूनही सुरुच आहेत. सामना संपला असला तरी मॅच फिव्हर काही उतरला नाही असेल म्हणावे लागेल. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायलर होताना दिसत आहे.

कालच्या सामन्यामधील हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय पाठीराखे विरुद्ध पाकिस्तानी पाठिराख्यांची घोषणाबाजीची स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे. मैदानावरील प्रेक्षकांच्या स्टॅण्डमध्येच शूट केलेल्या या व्हिडीओत पाकिस्तानी पाठिराखे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत. तीन चार वेळा ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या भारतीय प्रेक्षकांच्या स्टॅण्डमधून चक्क ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष होताना ऐकू येत आहे. भारतीय नागरिक जगभरात वास्तव्यास आहेत. त्यातही सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. म्हणूनच कदाचित काल भारत पाकिस्तान सामन्यासाठी उपस्थित असणाऱ्या भारतीय पाठीराख्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला गणपती बाप्पा मोरयाने उत्तर दिले असणार. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

हा व्हिडीओ सध्या ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल होत आहे. रविवारी पुन्हा एकदा भारताचा आणि पाकिस्तानचा संघ मैदानात दोन हात करताना दिसेल. तोपर्यंत तरी नेटवर भारताच्या याच विजायाच्या चर्चा सुरु असतील असचं सध्या दिसत आहे.

First Published on September 20, 2018 2:06 pm

Web Title: pakistan zindabad was replied by ganpati bappa morya during india vs pakistan match
Just Now!
X