News Flash

VIRAL VIDEO : ‘हा’ हेअरस्टाईलिस्ट केस कापत नाही तर जाळतो!

जीवघेणे असले तरी ग्राहकांची वर्दळच

पाकिस्तानी पत्रकार ओमर कुरेशी यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी गुलबर्गमधल्या ‘दशरथ ऑफ राज मेन्स पार्लर’चा व्हायरल झालेला व्हिडिओ तुमच्या लक्षात असेल. या पार्लरमधील दशरथ नावाच्या हेअर स्टाईलिस्टने चक्क मेणबत्तीने आपल्या ग्राहकांचे केस कापले होते. आता पाकिस्तानमधल्या एका हेअरस्टाईलिस्टनेही असाच काहीसा प्रकार करायाला सुरुवात केली आहे. हा हेअरस्टाईलिस्ट आपल्या पार्लरमध्ये आलेल्या ग्राहकांच्या केसांना चक्क आग लावतो आणि मग त्यांचे केस कापतो.

 वाचा : एका दिवसात सर्वाधिक हेअर कट्सचा रचला विक्रम, गिनीज बुकात नोंद

पाकिस्तानी पत्रकार ओमर कुरेशी यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळत हा हेअरस्टाईलिस्ट केस कापतो पण असे असले तरी त्याच्या या अनोख्या केस कापण्याच्या पद्धतीमुळे अनेक ग्राहक त्याच्याकडे केस कापतात. जीव धोक्यात घालून त्याच्याकडून ग्राहक केस कापून घेत आहेत. हा हेअरस्टाईलिस्ट ग्राहकांचे केस अक्षरश: पेटवून देतो. असे करणे किती धोकादायक ठरू शकते पण तो अत्यंत सहजतेने केसांना आग लावतो. त्यानंतर कात्रीने तो अगदी सहजतेने केस कापतो. केसांना आग लागलेली असूनही ग्राहकाला मात्र कोणतीही इजा होत नाही हे धक्कादायकच होते.

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडोओमध्ये चक्क कु-हाड आणि हातोडी घेऊन एकाने ग्राहकाचे केस कापले होते. तर केस कापण्याच्या अशा अजब स्टाईलने कर्नाटकमधल्या दशरथला देखील प्रसिद्धी मिळाली होती. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो मेणबत्तीने केस जाळून केस कापत आहे. ‘वेगळे काहीतरी दिले की ग्राहक नेहमीच आकर्षित होतात, मलाही ग्राहकांना नवीन काहीतरी द्यायचे होते. इथे नेहमी वीज जायची. वीज गेली की आम्ही मेणबत्त्या पेटवून काम करायचो. एकेदिवशी आपण मेणबत्ती वापरून का नाही केस कापायचे अशी कल्पना मनात आली. लगेच नेहमीच्या ग्राहकावर हा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी देखील झाला’ असेही दशरथने सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 9:45 am

Web Title: pakistani barber who lights peoples hair on fire to give a cut
Next Stories
1 १४ वर्षांच्या हर्षवर्धनसोबत गुजरात सरकारचा ५ कोटींचा करार!
2 बिहारमध्ये विद्यार्थिनीच्या प्रवेशपत्रावर छापले अश्लिल छायाचित्र
3 Makar Sankranti 2017: दरवर्षी १४ जानेवारीलाच मकर संक्रांत का साजरी केली जाते?
Just Now!
X