News Flash

‘त्या’ चहावाल्याचा मॉडेल लूक झाला व्हायरल

जीया अली या छायाचित्रकार तरुणीने चहा विकताना काढलेल्या फोटोमुळे अर्शदला लोकप्रियता मिळवून दिली.

पाकिस्तानचा चहावाला अर्शद खानचा नवा लूक व्हायरल होत आहे.

आपल्या निळ्या डोळ्याने पाकिस्तानच काय पण भारतातील मुलींना घायळ करणा-या पेशावरमधल्या चहावाल्याचा रंगलेल्या चर्चेप्रमाणे मॉडेलच्या रुपातील लूक समोर आला आहे. चहाच्या गाड्यावर अस्थावेस्थ कपड्यात दिसलेला चायवाला आपल्या नव्या लूकमध्ये स्टाईलिश कपडे घालून आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अर्शद खान नावाच्या पाकिस्तानी चहावाल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.  काही दिवसांपूर्वीच पाकिस्तामधल्या जीया अली या छायाचित्रकार तरुणीने पेशावरमधील इतवार बाजारात चहा विकणा-या अर्शद खानचा फोटो इन्टाग्रामवरुन शेअर केला होता. निळ्या डोळ्यांच्या या अर्शदनने पाकिस्तानीच काय पण सोशल मीडियावरच्या अनेक मुलींना भुरळ पाडली होती. दिवसभर सोशल मीडियावर तो चांगलाच चर्चेत राहिला होता. इतकेच काय पण त्याचे नाव आणि ‘चहावाला’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये ही दिसले. काहींनी तर त्याची तुलना बॉलीवूडच्या कलाकारांशी देखील केली. अर्शदच्या रुपाची चर्चा रंगल्यानंतर पाकिस्तानमधील ‘फिट इन’ या ऑनलाइन वेबसाईटने त्याला मॉडेलिंगची ऑफर देऊ केली होती.

पाकिस्तानमधल्या जिया अली या तरुणीने इन्स्ताग्राम अकाऊंटवरून चहावाल्याचा फोटो शेअर केल्यानंतर निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला चायवाला लोकप्रिय झाला. पर्शिअन लूक असलेल्या या तरुणाला पाकिस्तानी महिलांनाच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर देशातील महिला वर्गालाही त्याने वेड लावले. त्याची तुलना भारतातील लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या रणवीर सिंग तसेच ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या वादानंतर प्रकाशझोतात आलेल्या फवाद खानसोबत देखील करण्यात आली होती. पाकिस्तानमधील चायवाला अर्शदला पहिल्या फोटोनंतर काही मुलींनी सोशल मिडियावर लग्नाची मागणी घातली होती. तर अनेक जणींनी त्याला प्रेमाचे संदेश देखील पाठवले होते.

पेशावरच्या इतवार बाजारात चहा विकणाऱ्या अर्शदचा नवा लूक हा एखाद्या मॉडेलला लाजवेल असाच आहे.  चहावाल्याला मिळालेला हा लोकप्रियतेचा साज जीया अली या छायाचित्रकार तरुणीमुळेच मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरु नये. अर्शदचे सध्या व्हायरल होणारे फोटो नक्की कोणत्या ब्रँण्डसाठी मॉडेल म्हणून काम करताना करण्यात आले आहेत का याबाबत अधिकृत माहिती नाही. पण त्याचा हा लूक  मॉडेलिंगमध्ये तो अधिक प्रभावी ठरेल असे दिसून येते. पहिल्या फोटोने त्याला मिळालेल्या लोकप्रियतेत हा फोटो नक्कीच अधिक भर घालणारा असा आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानमधील हा चहावाला विविध ब्रॅडचे प्रमोशन करताना जाहिरातीत झळकला तर कदाचित नवल वाटणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:43 pm

Web Title: pakistani chaiwala arshad khan just got a makeover and new pic viral now
Next Stories
1 Video : अन् तिने टेनिस कोर्टमध्येच केस कापले
2 नेटिझन्स काहीही करु शकतात, #AnythingCanHappen हॅशटॅगवर रंगले नवे चर्चासत्र
3 Viral Video : ट्रम्पही म्हणतात ‘अबकी बार ट्रम्प सरकार’
Just Now!
X