04 March 2021

News Flash

VIDEO : लग्नमंडपात WWEचे वारे, अंडरटेकरच्या रुपात आला नवरदेव

नवरदेवाचा हा अफलातून अंदाज सध्या बराच चर्चेत आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा दिवस तसा फार महत्त्वाचा असतो. थीम वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंग अशा विविध ट्रेंडमुळे तर लग्नाच्या या घरगुती कार्यक्रमांना मोठमोठ्या इव्हेंट्सचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सध्याची तरुणाई याच ट्रेंडला फॉलो करत असून त्याचच एक उदाहरण पाकिस्तानमध्ये पाहायला मिळालं. तुम्हाला WWE आठवतंय का? केन, ट्रीपल एच, जॉन सिना, बतिस्टा यांचं राज्य असणाऱ्या WWEने एकेकाळी अनेकांच्या मनावर राज्य केलं होतं. मुळात काहीकांच्या बालपणी आणि तरुणाईच्या आठवणींमध्येसुद्धा WWEला महत्त्वाचं स्थान आहे. इतकंच काय तर लग्नाच्या मंडपातही आता WWEचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळाले.

फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये नवरदेव लग्नमंडपात चक्क अंडरटेकरप्रमाणे प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळतेय. इतकेच नव्हे तर त्याच्या हातात अंडरटेकरप्रमाणेच एक पट्टाही पाहायला मिळतोय. लग्नाच्या मंडपात असे अतरंगी प्रकार पाहायला मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपल्या आयुष्यातील खास दिवसाला आणखी खास करण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या नवरदेवाचा हा अफलातून अंदाज सध्या बराच चर्चेत आहे.

काळ्या रंगाचा लांबलचक कोट, काळी हॅट आणि ज्याप्रमाणे अंडरटेकर प्रवेश करतेवेळी वाजायची अगदी तिच धून असा संपूर्ण माहोल करत त्या नवरदेवाने मंडपात प्रवेश केला हे पाहून पाहुण्यांनाही धक्काच बसला असेल. असा हा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहाच…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 12:39 pm

Web Title: pakistani grooms undertaker like entry at his wedding is going viral watch video
Next Stories
1 अंडर १९ वर्ल्डकप: राहुल द्रविड ठरला हिरो
2 रिकाम्या घरांच्या बाबतीत मुंबई देशात पहिल्या स्थानावर
3 Viral Video : अन् हत्तीनं केली आंतरराष्ट्रीय सीमा पार
Just Now!
X