News Flash

३६ मुले असलेल्या या व्यक्तीच्या घरात पुन्हा हलणार पाळणा

कुटुंब १५० जणांचे

हल्लीच्या काळात लोकांकडून कुटुंब लहान असण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जोडप्यांकडून एक किंवा फारफार तर दोन मुलांना जन्म दिला जातो. मात्र, पाकिस्तानातील एका व्यक्तीला ३६ मुलं असूनही त्यांचा वंशविस्तार अजूनही थांबलेला नाही. गुलजार खान असे या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय साठच्या आसपास आहे. गुलजार खान यांनी तीन लग्नं केली आहेत. या तीन पत्नींपासून गुलजार यांना आतापर्यंत ३६ मुलं झाली असून लवकरच त्यांची पत्नी आणखी एका बाळाला जन्म देणार आहे. गुलजार खान यांची पत्नी, मुले आणि नातवंडे असा मिळून १५० जणांचा परिवार आहे. इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या गुलजार खान यांना या गोष्टीचा मोठा अभिमान वाटतो.

आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा भाऊ मस्तान यांनाही तीन पत्नी असून एकूण २२ मुले आहेत. याबाबत मस्तान यांना विचारले असता ते म्हणतात, माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. तो जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला अन्न देईल, अशी माझी श्रद्धा आहे. कुटुंबाचा पसारा वाढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना अजिबात चिंता नाही. पाकिस्तान लोकसंख्येच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकांचा देश आहे.

माझ्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी मित्रमंडळींची आवश्यकता भासणार नाही, असेही गुलजार सांगतात. ते म्हणतात, ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली आहे. त्यांचा जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया असताना ती रोखणारे आपण कोण?, असा सवाल ते विचारतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 4:03 pm

Web Title: pakistani man gulzar khan is father of 36 kids and expecting one more soon
Next Stories
1 Video : …आणि ‘त्या’ अवस्थेत कुत्र्याच्या पिल्लाला पाहून मालक घाबरला
2 स्वतंत्र भारताचा पहिला मतदार वयाच्या शंभरीत पुन्हा बजावणार मतदानाचा हक्क
3 Video : अन् मोबाईलनं खिशातच पेट घेतला
Just Now!
X