17 July 2019

News Flash

अनिल कपूरच्या शैलीतील डायलॉगबाजी पडली महागात, पोलीस बडतर्फ

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शूटआउट अॅट वडाला' या चित्रपटातील डायलॉग म्हटले

चित्रपटातील डायलॉग म्हणणे ही अतिशय सामान्य वाटणारी गोष्ट. कधी मनोरंजन म्हणून तर कधी उगाच स्टाईल मारण्यासाठी ही डायलॉगबाजी केली जाते. नुकतीच एका पोलिसाने केलेली अशीच डायलॉगबाजी त्याला भलतीच महाग पडली. या डायलॉगबाजीमुळे त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. आता त्याने असे कोणते डायलॉग म्हटले की ज्यामुळे त्याची थेट हकालपट्टीच करण्यात आली. तर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या या पोलिसाने भारतातील अनिल कपूर या अभिनेत्याचे डायलॉग म्हटले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शूटआउट अॅट वडाला’ या चित्रपटातील डायलॉग म्हटला. ‘दो वक्त की रोटी खाता हूं, पांच वक्त की नमाज पढता हूं…इससे जादा मेरी जरुरत नहीं और मुझे खरीदने की तेरी औकात नही’ हा डायलॉग म्हटला.

पाकपतानातील कल्याणा पोलिस स्थानकातील पोलिस निरीक्षक अरशद यांचा हा डायलॉग म्हणतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तो पाहिला. त्यानंतर पाकपतानचे जिल्हा पोलिस अधिकारी मारिक महमूद यांनी अरशद यांना लगेच कामावरुन बडतर्फ केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. काही महिन्यांपूरर्वीही पाकिस्तानमधून अशाचप्रकारे आणखी एका पोलिसाला कामावरुन कमी करण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या एयरपोर्ट सिक्युरीटी फोर्समधील एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित केले होते कारण तिने एक गाणे गुणगुणले होते. या महिला कर्मचाऱ्याने पाकिस्तानी झेंडा असलेली टोपी घालून भारतीय गायक गुरु रंधावा याचे ‘हाय रेटेड गबरु’ हे गाणे म्हटले होते.

First Published on December 1, 2018 12:46 pm

Web Title: pakistani police officer suspended after saying actor anil kapoor dialogue