बॉसला रजा मागणे हे काम प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी काहीसे अवघडच असते. मग त्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधले जातात. मग दोन किंवा चार दिवसांहून अधिक रजा हवी असल्यास ती कशी मागावी यातच ४ दिवस घालवले जातात. बॉसला रजा मागणे ही काही भारतातच घडणारी गोष्ट नाही तर जगभरात हे घडते. पाकिस्तानमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. तिथल्या एका रेल्वे अधिकाऱ्याने मंत्रालयाच्या अधिकाऱ्याला पत्र लिहून रजेचा अर्ज केला आहे. आता अधिकाऱ्याला पत्र लिहीले म्हणजे त्याने एक किंवा दोन आठवड्यांची रजा मागितली असावी असे आपल्याला वाटेल. पण त्याने एक दोन नाही तर तब्बल ७३० दिवसांती रजा मागितली आहे.
आता या अधिकाऱ्याला इतकी मोठी रजा का हवी याचे कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. या अधिकाऱ्याचे नाव आहे मोहम्मद हनीफ गुल. रेल्वे मंत्री राशिद अहमद यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे. त्यांचे वर्तन आपल्याला योग्य नाही असे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. नव्या मंत्र्यांची वृत्ती अव्यवसायिक अससल्याने आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करणे जमत नसल्याचे त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. गुल हे रेल्वेच्या ग्रेड २० चे सदस्य असून नागरी सेवेतील सन्मानित सदस्य म्हणून माझी ही विनंती मान्य करावी असे त्यांनी म्हटले आहे.
First jolt to Railways.
A senior official applies for 2-years leave citing nonprofessional and ill mannered behaviour of new Railways Minister. pic.twitter.com/3lDmVshS9U— Gharidah Farooqi (@GFarooqi) August 26, 2018
सोशल मीडियावर गुल यांच्या सुटीच्या अर्जाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. ट्विटरवर त्यांच्या या रजेचा अर्ज व्हायरल झाला असून त्याला नेटीझन्सनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी त्यांच्या या सुट्टी मागण्याच्या धैर्याचे कौतुक केले आहे तर काहींनी इतकी मोठी रजा मागण्यावरुन त्यांच्यावर टीकाही केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 6:53 pm