01 March 2021

News Flash

Video : पर्स लांबवणाऱ्या चोराला पाकिस्तानी महिलांनी दिला बेदम चोप

रावळपिंडी येथील घटना

चोर रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करतात…त्यांच्या हातातील पर्स किंवा गळ्यातील दागिने ओढतात…मग या धाडसी महिला चोरांचा पाठलाग करुन त्यांना पकडतात आणि बेदम चोप देतात….एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशीच ही कथा. पण पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. या महिलांनी आपली पर्स खेचणाऱ्या दोन चोरांना त्यांच्याच तऱ्हेने उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे चोरांची झटापट आणि महिलांनी त्यांना दिलेला चोप याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दोन महिला रस्त्याच्या कडेनी चालल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी बाईकवरुन २ चोर आले आणि त्यांनी यातील एका महिलेची पर्स ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या महिलेनी न घाबरता या चोरांचा पाठलाग केला आणि त्याला पकडून चांगला चोप दिला. चोरांची गाडी घसरल्याने ते महिलेच्या सहज हाती लागले. त्याचवेळी दुसरी महिला मात्र घाबरुन दूर पळाली. या महिलेने आधी एकाला मारले आणि नंतर ती दुसऱ्याला मारायला लागली. मात्र ही हाणामारी पाहून रस्त्यातील काही लोकांनी तिला आवरायचा प्रयत्न केला.

ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेने दिलेला चोप आणि तिचे धाडस याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून तिचे कौतुक होत आहे. महिला नाजूक आणि कमजोर असतात असे समजणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. महिलेचा चोराला मारतानाचा हा व्हिडिओ इतर महिलांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देणाराच आहे असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 7:01 pm

Web Title: pakistani rawalpindi woman beat up thieves who tried to snatch her purse video
Next Stories
1 इस्रायलने जगाला दिलेल्या अफलातून गोष्टी माहितीयेत?
2 VIDEO : ‘है अपना दिल तो आवारा’चे हे हटके व्हर्जन पाहिलं का?
3 ‘या’ देशाच्या पंतप्रधान होणार आई! फक्त सहा आठवडेच घेणार सुट्टी
Just Now!
X