24 February 2021

News Flash

Video : मित्राचे ब्रेकअप त्यांनी असे केले सेलिब्रेट

अभ्यास, करियर हे सगळे असतेच पण कॉलेजच्या वयात केलेली ही मजामस्ती आपल्या आयुष्यभर लक्षात राहते.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या वाईट काळात साथ देतात तेच खरे मित्र असतात. अनेकदा कोणतीही घटना घडली तरी आपण ती सगळ्यात आधी आपल्या मित्र-मैत्रिणींशीच शेअर करतो. अशावेळी ते कधी आपल्याला हसवून तर कधी आपले काऊंसिलिंग करुन आपल्याला त्यातून मार्ग काढण्यास मदत करतात. महाविद्यालयीन काळात तर मित्र हेच सर्वस्व असतात. आता हेच बघा ना पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये नुकतीच एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली. येथील काही तरुणांनी आपल्या मित्राच्या ब्रेकअपचे खास सेलिब्रेशन केले. हे सगळे विद्यार्थी कॉमसॅट्स इन्स्टीट्यूशन ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या शिक्षण संस्थेतील आहेत. हे सेलिब्रेशनही एकदम खास आहे. त्याचा व्हिडीयो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे.

ज्याचे ब्रेक अप झाले आहे त्याच्या गळ्यात हार घालून त्याला अगदी मानाने कॉलेजमध्ये आणले जाते. त्यानंतर त्याच्या अंगावर सगळ्याबाजूने स्नो स्प्रे उडविण्यात येतो. इतकेच नाही तर हे १५ ते २० जण मिळून ‘गर्लफ्रेंड भाग गयी’ अशा घोषणाही ते देतात. त्यानंतर व्हिडीयोमध्ये एक केकही आणलेला दिसत आहे. आपल्याकडे साधारणपणे वाढदिवस किंवा एखाद्या आनंददायी गोष्टीचे केक कापून सेलिब्रेशन केले जाते. मात्र याठिकाणी हे विद्यार्थी आपल्या मित्राच्या ब्रेकअपचे अशापद्धतीने केक कापून सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा ब्रेकअप झालेला मित्रही हे सगळे अतिशय आनंदाने स्विकारत ते एन्जॉय करताना दिसतो. अभ्यास, करियर हे सगळे असतेच पण कॉलेजच्या वयात केलेली ही मजामस्ती आपल्या आयुष्यभर लक्षात राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 4:14 pm

Web Title: pakistani students celebrating break up of friend viral video
Next Stories
1 लँडिग आधीच उघडला आपातकालीन दरवाजा, काय तर म्हणे गरम होतंय!
2 …म्हणून धोनी फॉर्ममध्ये परतला, रचला मोठा विक्रम
3 विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्याला पोलिसांचं भन्नाट उत्तर
Just Now!
X