News Flash

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

प्रेमात असलेल्या प्रत्येकाला हे जग जणू एका परिकथेप्रमाणेच वाटतं.

छाया सौजन्य- ट्विटर

‘प्रेम’… या एका शब्दाचा उल्लेख करताच अनेकांच्या मनात विविध भावना दाटून येतात. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’, ही ओळही लगेचच अनेकांच्या मनात येते. प्रेमात असलेल्या प्रत्येकाला हे जग जणू एका परिकथेप्रमाणेच वाटू लागतं. या परिकथेत राजकुमार, राजकन्या असतातच. पण, त्यासोबतच असते ते म्हणजे त्यांच्यातील निखळ प्रेम. अशाच या प्रेमाच्या जोरावर पाकिस्तानातील एक वयोवृद्ध महिला थेट साता समुद्रापार पोहोचली आहे.

आपल्या जोडीदाराच्या साथीने जगलेल्या त्या अविस्मरणीय क्षणांची आठवण पुन्हा जागवण्यासाठी ‘चाची’ लंडनला पोहोचल्या होत्या. पतीसोबत व्यतीत केलेले क्षण पुनरुज्जिवीत करणाऱ्या या महिलेच्या प्रेमकहाणीने सध्या सोशल मीडियावर अनेकांचेच लक्ष वेधले आहे. ‘चाची चॅटर्स’ या नावाने ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या या महिलेने लंडनमध्ये जात ठराविक उद्यानातील ज्या कारंज्याखाली असणाऱ्या बाकड्यावर आपल्या पतीसोबत निवांत क्षण व्यतीत केले होते, त्या आठवणींना उजाळा दिला. बऱ्याच वर्षांपूर्वी त्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली होती. पण, आता मात्र तिथे बरेच बदल झाले, त्यामुळे त्या उद्यानात पोहोचल्यावर नेमके आपण कोणत्या कारंज्याखालच्या बाकावर बसलो होतो हे त्यांच्या लक्षात आले नाही. इथे त्यांनी नेटकऱ्यांची मदत घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी काही ट्विटही केले. काही नेटकऱ्यांनी चाचीला त्या जागेचा शोध घेण्यास मदतही केली.

आणीबाणीवर आधारित माहितीपट प्रमाणित करण्यास सेन्सॉरचा नकार

 

एकामागोमाग एक बरेच ट्विट करत चाचीने आठवडाभराच्या त्यांच्या लंडन सफरीचे सुरेख वर्णन केले आहे. पतीच्या कामानिमित्त लंडनला जाणे झाले असतानाच्या त्या सुखद आठवणींना उजाळा देणाऱ्या या चाचींचे ट्विट पाहून अनेकांनाच त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या त्या खास व्यक्तीची आठवण झाली आहे. वय, देश, प्रांत, काळ अशा कोणत्याच सीमांच्या बंधनात न अडकणाऱ्या या प्रेमकहाणीनेच एक प्रकारे अनेकांना जोडलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

‘चाची चॅटर्स’ना नेटकऱ्यांनी अशी मदत केली

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2018 5:17 pm

Web Title: pakistani woman chachi chatterss love story on travelling to london to relive the memories of her dead husband is going viral twitter
Next Stories
1 VIDEO : मित्रांना बार्बेक्यू ट्रिट देत शेफ सचिनने मारला मास्टर स्ट्रोक
2 Viral : प्रेरणादायी मलाला, २०१७ मधील तिचा प्रवास
3 Viral Video : सानिया मिर्झाचा ‘तो’ डान्स व्हायरल
Just Now!
X