X

Viral Video : होवरबोर्डचा असा उपयोग कंपनीलाही सुचला नसेल..

ही कोणत्या युगात राहते?

सोशल मीडियावर कधी, काय व्हायरल होईल याचा नेम नाही. एखादी जगावेगळी गोष्ट नजरेस पडली आणि ती वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली नाही तर नवलच! आता हेच बघाना पाकिस्तानमधला हा व्हिडिओ येथेही तितकाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

एक बाई चक्क होवरबोर्डचा वापर करून अंगणातला कचरा काढत होती. अंगण झाडायचं म्हणजे किती त्रासदायक काम आहे हे वेगळं सांगायला नको. वाकून अंगणात कचरा काढायचा म्हणजे पाठ पुरती कामातून जाते. आता या समस्येवर तिने इतका भन्नाट उपाय शोधू काढलाय आहे की होवरबोर्डचा वापर कचरा काढण्यासाठीदेखील होऊ शकतो याची कल्पना त्या कंपनीला स्वप्नातही सुचली नसेल हे नक्की!

या पाकिस्तानी महिलेने अगदी सहजतेने होवरबोर्डवर संतुलन राखलं होतं. ती ज्या सहजतेने अंगणात कचरा काढत होती ते पाहून एखाद्या नवख्याने आश्चर्याने तोंडात बोट घातली नसतील तर नवल!

Viral : यांचा काही नेम नाही!; जिवंतपणीच मित्राच्या शोकसभेचं आयोजन

First Published on: October 4, 2017 1:28 pm
Outbrain