News Flash

Viral Video : तरुणांवर चढली ‘त्या’ चहावाल्याच्या गाण्याची झिंग

अर्शद खानचा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अर्शद खानवर 'चायवाला' हा म्युझिक व्हिडिओ बनवला आहे.

गेल्या महिन्यात सोशल मीडियावर तमाम तरुणांना वेड लावणा-या पाकिस्तानी चहावाला म्हणजेच अर्शद खान यावर दोन रॅपरने म्युझिक व्हिडिओ बनवला होता. ‘चायवाला’ याच नावाने बनवलेला हा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. यात अर्शद खान यांने आपल्या दिलखेच अदांनी पुन्हा एकदा तरुणींना वेड लावले आहे.

वाचा : ‘त्या’ चहावाल्याचा मॉडेल लूक झाला व्हायरल

पाकिस्तामधल्या जीया अली या छायाचित्रकार तरुणीने पेशावरमधील इतवार बाजारात चहा विकणा-या अर्शद खानचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. निळ्या डोळ्यांच्या या चहावाल्याने तरुणींना इतके वेड लावले होते की त्यानंतर सगळीकडेच ‘चायवाला’ हा हॅशटॅश देखील ट्रेंडिंगमध्ये होता. त्याला अल्पावधितच इतकी प्रसिद्धी मिळाली की पाकिस्तानच्या एका ऑनलाईन बेवसाईटने त्याला मॉडलिंगची ऑफरची देऊ केली. त्यानंतर पाकिस्तानच्या अनेक ब्रँडसाठी त्याने मॉडलिंग देखील केली होती. त्याचे नव्या लूकमधले फोटोही सोशल मीडियावर खूपच गाजले होते. त्याचा म्यूझिक व्हिडिओ आल्यानंतर  पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याचे चर्चे होऊ लागले आहेत.

Viral : ‘त्या’ चहावाल्याची मोदी आणि बॉलीवूडच्या कलाकारांशी तूलना

पाकिस्तानच्या प्रसिद्ध बँडमधले रॅपर ‘सिद’ आणि ‘डिजे डॅनी’ यांनी मिळून ‘चायवाला’ हा म्युझिक व्हिडिओ बनवला आहे. अर्थात या व्हिडिओमध्ये अर्शदचा चहाविक्रेत्यापासून ते मुलींच्या गळ्यातील ताईद बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता खूपच गाजत आहे. पेशावरमध्ये आधी चहा विकणारा अर्शद हा फक्त १८ वर्षांचा आहे. त्याला १६ भावंडे आहेत आणि गेल्या २५ वर्षांपासून त्याचे कुटुंब इस्लामाबादमध्ये राहते. तीन महिन्यांपूर्वीच त्याने चहाचा गाडा सुरु केला होता. एका फोटोने प्रसिद्धी मिळवून दिल्यानंतर अर्शद पाकिस्तानी माध्यमातून बरेचदा दिसला. हल्लीच त्याने एका टीव्ही कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. तर पाकिस्तानी फॅशन विकमध्ये त्याने रँम्प वॉकही केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 6:30 pm

Web Title: pakistans chaiwala arshad khan makes his music video debut looking charming as ever
Next Stories
1 १९ व्या शतकात जन्मलेल्या महिलेने आज साजरा केला वाढदिवस
2 हॅकरच्या करामतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ट्रम्प टॉवर’चे गुगलवर झाले ‘डम्प टॉवर’
3 मोदी फक्त फिरकी घेत आहेत