News Flash

फेकन्युज : नेहरू संघाच्या शाखेत?

अलीकडेच एका फेसबुक पेजवरून प्रसिद्ध झालेल्या एका छायाचित्रात पंडित नेहरू हे रा. स्व. संघाच्या शाखेतील बैठकीला हजर राहिल्याचे दिसत आहेत.

अलीकडेच एका फेसबुक पेजवरून प्रसिद्ध झालेल्या एका छायाचित्रात पंडित नेहरू हे रा. स्व. संघाच्या शाखेतील बैठकीला हजर राहिल्याचे दिसत आहेत. ‘हे छायाचित्र खूप प्रयत्न करून मिळवले आहे. नेहरूजी रा. स्व. संघाच्या शाखेत उभे आहेत. आता बोला, नेहरू हेदेखील भगवे दहशतवादी आहेत म्हणून..’ असे सांगणारा एक संदेश या छायाचित्रावर हिंदीत आढळतो. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या ‘फॅन पेज’वरून हे छायाचित्र प्रसारित करण्यात आले आहे. या छायाचित्रात नेहरू हे अर्धी चड्डी, टोपी आणि काठी घेऊन उभे असल्याचे दिसून येते. खरंच पं. नेहरू संघाच्या शाखेत गेले होते का?

याचे उत्तर नाही असे आहे. हे छायाचित्र उत्तर प्रदेशमधील नैनी येथे १९३९ साली घेतलेले आहे. पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील नव्हे तर, राष्ट्र सेवा दलाच्या बैठकीतील आहे. १९२४ साली हिंदुस्थानी सेवा दल नावाने स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचा मुख्य हेतू ब्रिटिश राजवटीविरोधात लढा देण्याचा होता आणि या दलातील स्वयंसेवकांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षणही दिले जात असे. पं. नेहरूही या दलात सक्रिय होते. तेव्हाची त्यांची अनेक छायाचित्रे उपलब्ध आहेत. राहिला प्रश्न रा. स्व. संघाच्या शाखेचा. तर, १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात काळी टोपी असायची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:02 am

Web Title: pandit nehru rss office fake news
Next Stories
1 फेकन्युज : प्राण्यांनाही सोडत नाहीत!
2 सुरक्षित ऑनलाइन खरेदी
3 न्यारी न्याहारी : इडली ढोकळा
Just Now!
X