प्रेमी युगुलाची सगळ्यात आवडती नगरी पॅरिस सध्या चर्चेत आली आहे. पण चर्चेचे कारण काही वेगळे आहे. पॅरिसला प्रदूषणाचा भस्मासूर गिळत आहे आणि ही प्रेमनगरी प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी पॅरिसमध्ये सार्वजनिक वाहतूक आता मोफत करण्यात आली आहे.

वाचा : जयललिता यांच्याकडे होत्या १० हजारांहूनही अधिक साड्या?

गेल्या वर्षभरात पॅरिसमधल्या हवामानात मोठे बदल घडून आलेले दिसून येते आहे. या शहराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अहवालात पॅरिसमध्ये प्रदूषणाची पातळी वाढत चालली असल्याचे समोर आले आहे. आणि या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे सार्वजनिक वाहनांनी मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा प्रकारे सवलत देऊन लोक त्यांच्या खासगी वाहानांचा वापर करतील, आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल असे सरकारला वाटते. गाड्यांमुळे होणारे वायु प्रदूषण कमी होईल असे सरकारला वाटते. म्हणून पॅरिसमध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना देखील जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थंडीचा मौसम सुरू आहे. पण पॅरिसमधील हवा अधिका अधिक प्रदूषित होत चालली आहे. थंडीच्या काळात घर उबदार राहावे, यासाठी घरात लाकडे जाळली जातात. त्यामुळे प्रदूषणात अधिक वाढ होत आहे. पॅरिसमध्ये प्रदूषणावर उपाय म्हणून सम विषम क्रमांकाची वाहने आलटून पालटून रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ही संकल्पना तिथे यशस्वी झाली नाही. तेव्हा प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पॅरिसने सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा : जगातील लठ्ठ महिलेला भारतात आणायचे कसे?