News Flash

VIDEO: जेव्हा काँग्रेसचा आमदारच म्हणतो, ‘पक्ष गेला तेल लावत’

ट्विटवर #CongressGayiTelLene हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग हॅशटॅग

जितू पटवारी

रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस हे भारतातील दोन मोठे राजकीय पक्ष समोरासमोर येताना दिसत आहेत. त्यावरून सोशल नेटवर्किंगवरही जोरदार चर्चा आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दोन्ही पक्षांचे समर्थक ऑफलाइन आणि ऑनलाइन समर्थन देताना दिसत आहेत. मात्र काँग्रेस भाजपाला तोंड़ देण्याबरोबरच आपल्या काही मंत्र्याच्या वागण्यावरून सध्या सोशल मिडियावर ट्रोल होताना दिसत आहे. सध्या काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील आमदार जीतू पटवारी यांच्या एका वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष ट्विटवर ट्रोल होत आहे. इंदूरजवळील राऊ मतदारसंघात प्रचारादरम्यान पटवारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या ट्विटवर #CongressGayiTelLene (काँग्रेस गयी तेल लेने) हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे.

‘एएनआय’ने केलेल्या ट्विटनुसार सोशल मिडियावर सध्या जीतू पटवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ‘आप मेरी लाज रखें, पार्टी (काँग्रेस) गयी तेल लेने. (तुम्ही माझी लाज राखा, पक्ष गेला तेल लावत)’ हे वाक्य पटवारी निवडणुक प्रचारादरम्यान मतदारांच्या घरी जाऊन चर्चेदरम्यान बोलताना दिसत आहेत. पक्षासाठी मते मागण्याच्या उद्देशाने दारोदारी गेलेल्या आमदारानेच अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्ष मस्करीचा विषय ठरला आहे.

पटवारी हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. राज्यातील निवडणूक तोंडाशी असताना राज्यातील प्रमुख नेते ज्योतिरादित्य सिंधीया, कमल नाथ, दिग्विजय सिंह यासारख्या बड्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या पटवारींनी अशा पद्धतीने पक्षाबद्दल वक्तव्य केल्याने पक्ष टिकेचा धनी ठरला आहे. राज्यामधील नेतृत्व विभागण्यात आल्याने प्रत्येक गट हा आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी लढत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षापेक्षा आपली प्रतिष्ठा जपण्यामध्ये नेत्यांना स्वारस्य असल्याची टिका वारंवार झाली आहे. त्यातच पटवारींच्या या वक्तव्यामुळे एकप्रकारे यावर शिक्कामोर्तबच झाल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या वर्चस्वाच्या लढाईमुळेच मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला राज्यात अपयश आले आहे.

एएनआयने ट्विट केल्यानंतर ट्विटवर #CongressGayiTelLene हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग हॅशटॅग पैकी एक झाला आहे. अनेकजण पटवारी आणि काँग्रेसची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

एकंदरीतच या वक्तव्यामुळे पटवारी यांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीतच दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ११ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 4:31 pm

Web Title: party gayi tel lene says jitu patwari rahul gandhis close aide
Next Stories
1 ‘ह्युंदाई’ची नवी Santro आज होणार लॉन्च
2 धाकड गर्ल बबिता म्हणते; हॅलो फ्रेंडस, दूध पी लो
3 #RanveerDeepikaWedding : तारीख ठरली अन् मीम्सची सुपारी फुटली
Just Now!
X