News Flash

‘ऑक्सफर्ड’च्या शब्दकोशात पटेलांचा बोलबाला!

५० हजार कुटुंबियांचे मूळ शोधून हा शब्दकोश तयार करण्यात आला आहे.

इतर भारतीय आडनावांमध्ये 'चक्रवती' या नावाचा समावेश

गुजरातमधील बहुचर्चित पटेल समुदायाचे नाव ‘ऑक्सफर्ड’च्या नव्या शब्दकोषात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. ‘ऑक्सफर्ड’ने ब्रिटन आणि आयर्लंडमधील कुटुंबियांच्या आडनावांचा शब्दकोश नुकताच प्रकाशित केला. या नव्या शब्दकोशात भारतातील पटेल हे आडनाव सर्व सामान्य असल्याचे दिसून येते. ब्रिटन आणि आयर्लंडमधील ५० हजार कुटुंबियांचे मूळ शोधून हा शब्दकोश तयार करण्यात आला आहे.

आभ्यासानुसार, हिंदू आणि पारसी समुदायामध्ये गुराख्यांमध्ये पटेल हे नाव सर्वसामान्य असल्याचे दिसून आले. २०११ च्या जणगणनेनुसार पटेल आडनावाची १ लाख इतकी संख्या होती. इतर भारतीय आडनावांमध्ये ‘चक्रवती’ या नावाचा समावेश आहे. हे नाव संस्कृतमधून घेण्यात आले आहे.
कुटुंबियांच्या आडनावाचे विश्लेषण करण्यासाठी ११ व्या शतकापासूनच्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे चार वर्षाच्या अभ्यास करण्यात आला. भाषातज्ज्ञ आणि इतिहासकारांनी आडनावाचे विश्लेषण केले आहे. ब्रिस्टल विद्यापीठातील भाषाशास्राचे प्राध्यापक रिचर्ड कोट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची माहितीती विस्तारित आणि अधिक व्यापकपणे मांडण्यासाठी नवीन पुरावे आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे म्हटले आहे.

शब्दकोशात समाविष्ट करण्यात आलेल्या २० हजार अडनावामध्ये १० हजार नावे ही स्थळांच्या नावावरुन उदयास आली आहेत. तर ४ हजार नावे ही टोपण नावाच्या माध्यमातून उदयास आली आहेत. तर ८ टक्के नावेही व्यावसायानुसार उदयास आली आहेत. शब्दकोशामध्ये समावेश असणाऱ्या इतर अडनावामध्ये विविध भाषा, संस्कृती याचा देखील समावेश असल्याचे दिसून येते. यामध्ये भारत, फ्रेंच, डच, जेविस अरेबिक, कोरियन, जपानी, चायनीज आणि अफ्रीकामधून आलेल्या लोकांचा समावेश होतो. १८८१ ते २०११ या जनगणनेमध्ये अडनाव किती वेळा आले आहे या उल्लेखासह अडनावाच्या संस्कृतीबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2016 9:06 pm

Web Title: patel most common indian surname in uk dictionary
Next Stories
1 अन् ‘किट-कॅट’ने त्याला गाडीभर चॉकलेट्स पाठवून दिले
2 Viral Video : वाहतूक कोंडीतही महिलांना नृत्य करण्याचा मोह अनावर
3 ‘ही’ हजार आणि दोन हजारांची नोट तुम्हाला बनवेल ‘लखपती’
Just Now!
X