05 June 2020

News Flash

Lockdown effect : मुंबईच्या रस्त्यांवर नाचतायेत मोर

सतत वर्दळ असणाऱ्या मुंबईत शुकशुकाट असल्यामुळे सध्या पक्षी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत

जगभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतामध्ये करोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या दोन हजारांच्या आसपास गेली आहे. करोना व्हायरसची महामारी रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. सध्या सर्वांच्या कानी करोना आणि लॉकडाऊन हेच शब्द पडत आहेत. या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सतत वर्दळ असणाऱ्या मुंबईत शुकशुकाट आहे. अशातच मुंबईच्या रसत्यांवर मोर फिरत असल्याचे समोर आले आहे.

नुकताच बॉलिवूड फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रस्त्यावरील माणसांची आणि वाहनांची वर्दळ कमी झाल्यामुळे मोर बिनधास्त फिरताना दिसत आहे. फोटोमध्ये एक मोर कारवर चढला आहे तर दुसरा मोर नाचत असल्याचे दिसत आहे. सध्या हे मोर रस्त्यावर नाचत असतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मानवने शेअर केलेला हा फोटो मुंबईतील बाबूलनाथ भागातील आहे.

 

View this post on Instagram

 

Beautiful Peacocks having a field day on the streets of #babulnath in #mumbai #lockdown #mumbai #animals #india

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या अडीचशेच्या जवळ गेली आहे. गुरूवारी यात आणखी तीन रुग्णांची भर पडली. यात पुण्यामध्ये दोन, बुलढाण्यामध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा ३३८ वर गेला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. देशाच्या तुलनेत राज्यात या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १ टक्का अधिक आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडीत अडकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 7:03 pm

Web Title: peacocks dance on mumbai streets during lock lockdown watch viral video avb 95
Next Stories
1 …अन् व्हिडिओ कॉलदरम्यान बॉसच्या जागी दिसू लागला ‘बटाटा’; व्हायरल फोटोवर ‘मायक्रोसॉफ्ट’नेही केली कमेंट
2 ‘तुळशीबाग, FC रोड, सदाशिव पेठ सगळीकडे जाऊ पण…’; पुणे पोलिसांनीच शेअर केले भन्नाट ‘करोना उखाणे’
3 ‘या’ देशानं घातली करोना व्हायरस शब्दावर बंदी
Just Now!
X