News Flash

व्हायरल ट्विटमुळे स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आला कुटुंबियांना भेटण्याचा योग  

जी कुटुंबे एकत्र येण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांना मदत करण्याचे काम ही संस्था आणि येथील व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने करत असल्याचे चित्र आहे

Lourdes de Leon hugs her 6-year-old son Leo Jeancarlo de Leon as they are reunited at the shelter "Nuestras Raíces" in Guatemala City, Tuesday, Aug. 7, 2018. De Leon said she and Leo had gone to the U.S. in search of a better life because her low-paid job selling clothing wasn’t enough to provide him with a good future. They arrived in Arizona on May 10, and the boy was taken from her a couple of days later. She was returned to Guatemala on June 7, while he remained in a shelter in New York. (AP Photo/Oliver de Ros)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या झिरो टॉलरन्स स्थलांतरीत पॉलिसीमुळे अनेक पालक आणि त्यांची मुले यांची कित्येक दिवसांपासून ताटातूट झाली होती. मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत, याचे कारण ठरले आहे एक व्हायरल झालेले ट्विट. ही मुले आपल्या आई-वडिलांना भेटावीत म्हणीन अमेरिकेतील अनेक लोक आपली विमानाची तिकीटे या मुलांना दानही करत आहेत. आपल्याला याबाबत आलेले अनुभव अनेकांनी सोशल मीडियावर सोशल केल्याने इतरांनीही तशापद्धतीने मदत करण्यास सुरुवात केली.

जेफ विलेनस्की यांना एक तीन वर्षांचा मुलगा आणि त्याचे वडिल यांची ताटातूट झाल्याचे समजले आणि त्यांनी आपले आणि आपल्यासोबत प्रवास करणाऱ्यांची तिकीटे घेऊन या दोघांची मदत केली. त्यांच्या या कृत्याविषयी त्यांच्या पत्नीने लिहीले आणि त्यांना त्यावर अतिशय आश्चर्यकारक अशा प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर अनेकांना अशाप्रकारची मदत मिळायला लागली. कुटुंबांना एकत्र जोडण्याचे काम करणाऱ्या संस्थेने यामध्ये पुढाकार घेतला. जी कुटुंबे एकत्र येण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांना मदत करण्याचे काम ही संस्था आणि येथील व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने करत असल्याचे चित्र आहे.

हे ट्विट जाण्याआधी साधारण ८ ते १० जण अशाप्रकारे मदत कऱण्यासाठी पुढे आले होते. मात्र या ट्विटचा अतिशय चांगला परिणाम झाला आणि अखेर १७५ जणांनी मदतीचा हात पुढे केला. या ट्विटला आतापर्यंत १.३८ लाईक्स मिळाले असून ३१ हजार लोकांनी रिट्विट केले आहेत. ४ संस्थांनी केलेल्या मदतीमुळे या कुटुंबियांच्या प्रवासासाठी २५० हून अधिक विमानांचे बुकींग केले आहे. यामध्ये अमेरिकेतील अंतर्गत प्रवास आणि आंतरदेशीय प्रवासाचाही समावेश आहे. आपल्या पालकांपासून वेगळी झालेली जवळपास ३ हजार मुले आपल्या पालकांकडे सुखरुप जावीत असे अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे ही प्रक्रीया अतिशय वेगाने सुरु आहे. ही मुदत २६ जुलैला संपल्यानंतरही ५०० मुले आपल्या पालकांपासून दूर असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 8:13 pm

Web Title: people are donating air miles to reunite separated immigrant children and family viral tweet
Next Stories
1 सुवर्णसंधी…! तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता सचिन तेंडुलकरची BMW
2 VIRAL : ‘आयकिया’च्या उद्घाटनामुळे हैद्राबादमध्ये ट्रॅफिक जॅम, 40 हजार ग्राहकांची झुंबड
3 ‘मला ज्वालामुखीशी बोलावं लागेल’, सुषमा स्वराज यांचं ट्विटरवर भन्नाट उत्तर
Just Now!
X