नरेंद्र मोदी सरकारला आता सत्तेत येऊन तीन वर्षे झाली. ‘भष्ट्राचाराला आळा’, ‘काळा पैसा भारतात आणू’, ‘विकास’ यासारख्या अनेक आश्वासनांची ग्वाही देत मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेत आले. जनतेने बहुमाताने हे सरकार निवडून दिले. तेव्हा मोदी सरकारचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त एक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणानुसार मोदींच्या कार्यकाळात सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६१% जनता सुखी असल्याचे मत नोंदवण्यात आलं आहे. ‘लोकल सर्कल’तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

या सर्वेक्षणाअंतर्गत दोन लाख लोकांनी आपली मते नोंदवली आहेत. खेडेगावं आणि शहरे मिळून देशभरातील एकूण २०० ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले. तेव्हा यातल्या ६१ टक्के जनतेने मोदी सरकारची कामगिरी ही त्यांच्या अपेक्षापेक्षाही जास्त चांगली असल्याचे म्हटले आहेत. तर ५९ टक्के जनतेने या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होण्याचा मार्गावर असल्याचे मत नोंदवलं आहे.काही महत्त्वाच्या मुद्द्यावर हे सर्वेक्षण नोंदवण्यात आलं आहे. ४४ टक्के भारतीय जनतेचे म्हणणं असं आहे की मोदी सरकारने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्याच्या दिशेने या सरकारची वाटचाल सुरू आहे. तर ३९ टक्के जनतेचे म्हणणे यापेक्षाही अगदी उलट आहे. मोदी सरकारची कामगिरी अपेक्षेपेक्षाही खूपच कमी आहे, असं मत या जनतेने नोंदवलं आहे.

central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
shivraj patil chakurkar, Dr archana patil chakurkar, latur, amit deshmukh, congress, bjp
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”