News Flash

Viral Video : नटेलावर ७०% सूट… खरेदीसाठी मॉलमध्ये झाली हाणामारी

हे काही पहिल्यांदाच घडत नाही

लोक अक्षरश: मॉलमधल्या नेटलाच्या बॉक्सवर तुटून पडले.

एखाद्या वस्तूवर घसघशीत सवलत असेल तर त्यावर ग्राहक कसे तुटून पडतात हे काही आपल्याला नवं नाही. ‘सेल’ हा एक शब्द ग्राहकांची गर्दी ओढून घेण्यास पुरेसा असतो. तेव्हा सेल लागला रे लागला की ग्राहकांची तुडुंब गर्दी मॉल, दुकानात पाहायला मिळते. पण कधी एखाद्या पदार्थावर घसघशीत सुट जाहीर केल्यावर ग्राहकांमध्ये हाणामारी झाल्याचं तुम्ही पाहिलं आहेत का? मग फ्रान्समधला हा व्हिडिओ पाहा. फ्रान्ससारख्या सधन देशातही नटेलावर ७० टक्के सूट मिळणार असल्याचं कळताच अगदी ग्राहकांनी झुंबड उडाली.

लोक अक्षरश: मॉलमधल्या नटेलाच्या बॉक्सवर तुटून पडले. काहींनी तर धक्काबुक्की, हाणामारी केली. गोंधळ वाढल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मग पोलिसांना बोलवावे लागले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती आटोक्यात आणली. पाश्चिमात्य देशांत नटेला हे स्प्रेड सर्वात आवडता पदार्थ म्हणून गणला जातो. याचा खपही सर्वाधिक आहे. हे काही फ्रान्समध्ये पहिल्यांदाच घडलं असं नाही यापूर्वीही नटेलावर सूट जाहीर करताच ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त नटेला मिळवण्यासाठी हाणामारी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2018 6:33 pm

Web Title: people in france went all out crazy over nutella discount
Next Stories
1 ‘चित्राच्या बदल्यात सोन्याचा कमोड चालेल का?’, संग्रहालयाचा ट्रम्पनां प्रस्ताव
2 ९० वर्षांच्या जनाबाईही देतायंत कौमार्य चाचणी विरोधातील लढा!
3 Viral Video : दुचाकीस्वाराला दोन वाघांनी घेरलं, सुटकेचा थरार व्हायरल
Just Now!
X