मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए)डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोमवारी झाला. पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाण पुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचे ई लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांनी गर्दीसंदर्भात चिंता व्यक्त केली असतानाच या उद्घाटन सोहळ्याला झालेल्या गर्दीवरुन अनेकांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले. उद्धटनासाठी मेट्रो स्थानकावर गर्दी जमावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई होणार का?, अशा स्वरुपाचे प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांनी ट्विटवरुन उपस्थित केलेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी ही बंधने अजून उठवलेली नाहीत. करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. पण मुंबईतील आजची गर्दी चिंताजनक आहे. अशीच गर्दी राहिली तर  पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईकरांना दिला. मात्र त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला आलेले तेथील गर्दीचे फोटो व्हायरल झाले.

मुंबई भाजपानेही मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांवरील वाहतुककोडींसंदर्भात चिंता व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. “धक्का आम्हालाही बसला मेट्रो ट्रायलच्या कार्यक्रमाला तुम्ही जमवलेली गर्दी पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महोदय. फेसबुकवर सतत ‘गर्दी करू नका’असे आवाहन करणारा मुख्यमंत्री हाच का? असा सवाल उभा राहिला आमच्या मनात.तोंडाच्या त्या वाफा फक्त जनता जनार्दनासाठी असतात का?”, असा टोला भाजपाने लगावला आहे.

याचसंदर्भातील इतर ट्विटसही पाहुयात…

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

भाजपाने टाकला बहिष्कार

मुंबई मेट्रो-२ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो लाईनच्या चाचणीच्या निमंत्रणपत्रिकेवर मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री यांची तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची नावे होती. पण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात न आल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला व निषेध आंदोलनही केले.