सोशल नेटवर्किंगवर कधी कोणती गोष्ट आणि कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल नेटवर्किंगवरील चॅलेंज असो किंवा एखाद्या बातमीवरुन सुरु असणारी चर्चा, ट्रोलींग किंवा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी असो अनेक गोष्टी रोज सोशल नेटवर्किंगवरील ट्रेण्ड ठरवत असतात. सध्या असाच एक ट्रेण्ड सोशल नेटवर्किंगवर सुरु असून अनेकजण आपल्याला पहिला पगार कितव्या वर्षी आणि कोणत्या कामासाठी मिळालेला हे सांगताना दिसत आहेत. याचबरोबर पगार म्हणून किती पैसे पहिल्यांदा कामाई म्हणून मिळालेले हे ही लोकं ट्विट करुन सांगत आहेत. विशेष म्हणजे अनेक व्हेरिफाइड अकाऊंटवरुनही यासंदर्भात ट्विट करण्यात आल्याने Age 21 आणि Age 17 हे दोन टॉपिक सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्डींग होताना दिसत आहेत.

काहींच्या सांगण्यानुसार एका महिलेने आपल्याला एका अभ्यासासाठी यासंदर्भातील माहिती असल्याचे ट्विट केलं. यामध्ये तिने तुमची पहिली कमाई किती होती, ती कशी मिळाली आणि कितव्या वर्षी या तीन गोष्टी शेअर करण्यास सांगितल्या. त्यानंतर तिच्या या ट्विटवरुनच अनेकांनी तिला रिप्लाय देण्यास सुरुवात केली.

अनेक व्हेरिफाइड अकाऊंटवरुनही या संदर्भातील ट्विट करण्यात आलं आहे. तुम्हीच पाहा कोणाला किती आणि कशासाठी मिळाली होती पहिली सॅलरी…

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

अनेकांनी यावर मिम्सही शेअर केले असून काहींनी अगदी उपरोधिकपणे टोलेही लगावले आहेत.

११)

१२)

१३)

१४)

१५)

काय मग हे सारं पाहून तुम्हाला आठवतेय का तुमची पहिली सॅलरी?