News Flash

Viral Video : सिंहिणीला छेडणे बेतले तरुणाच्या जीवावर

सिंहिणीने तरूणावर हल्ला केला

एक तरुण पाळलेल्या सिंहिणीला छेडण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे राग अनावर झालेल्या या सिंहिणीने या तरुणाला आपल्या पंज्यात पकडण्याचा प्रयत्न केला.

अनेकजण घरात कुत्रा, मांजर, मासे किंवा पक्षी पाळतात पण काही जण असेही आहे ज्यांना हिंस्त्र प्राणी आपल्या घरात पाळण्याची आवड असते. त्यामुळे अशांच्या घरात अजगर, सिंह, वाघ असे प्राणी सर्रास दिसलीत त्यातूनही आखाती देशातील अनेक अब्जाधीशांना सिंह, सिंहिणी पाळण्याचे छंद असतो. फेसुबक किंवा इतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आपण पाहतो पण या हिंस्त्र प्राण्यांना कितीही माणसाळण्याचा प्रयत्न केला तरी ते आपला मूळ गुण कधीच विसरत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘लाईव्ह लीक’चा हा व्हायरल झालेला व्हिडिओ.

VIRAL : वृद्ध जोडपे अजगराचा करताहेत मुलाप्रमाणे सांभाळ

यात एक तरुण पाळलेल्या सिंहिणीला छेडण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे राग अनावर झालेल्या या सिंहिणीने या तरुणाला आपल्या पंज्यात पकडण्याचा प्रयत्न केला. एका छोट्याच्या जागेत या सिंहिणीला एकाने गळ्यात पट्टा बांधून पकडून ठेवले होते. सिंहिणही निवांत बसून होती. मात्र या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने या निवांत बसलेल्या सिंहिणीला छेडण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोक्यावर त्याने दोन तिनदा हात फिरवला त्यामुळे या सिंहिणीने त्याच्यावर हल्लाच चढवला. घाबरलेल्या या तरूणाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण या तरुणाला सहजासहजी जाऊ देईल ती सिंहिण कसली तिने त्याच्या अंगावर झेप घेत त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण दूस-या तरूणाने मदतीला धावत येत सिंहिणीच्या कचाट्यात सापडलेल्या या तरूणाची सुटका केली. ही सिंहिण फक्त या तरूणासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होती असे तिच्या मालकाने सांगितले.

Viral Video : तरुणीवर छाप पाडण्यासाठी पांडाला डिवचणे तरुणाला पडले महागात

काही दिवसांपूर्वी मुलींना प्रभावित करण्यासाठी चीनमधल्या एका तरूणाने प्राणी संग्रहालयातील पांडाच्या पिंज-यात उडी मारली होती. इतकेच नाही तर त्याने या झोपलेल्या पांडाला छेडण्याचा प्रयत्न देखील केला होता. अखेर राग अनावर झालेल्या पांडाने या तरूणाचे पाय पकडून ठेवले होते. शेवटी संग्रहलयाच्या कर्मचा-यांनी कसेबसे या तरूणाची पांडाच्या तावडीतून सुटका केली होती. याचे सीसीटीव्ही फूटेजही व्हायरल झाले होते. यात तरुणाला किरकोळ जखमा झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2016 7:21 pm

Web Title: pet lion breaking free of leash and attack on man
Next Stories
1 …म्हणून जीन्स पँट धुण्याची गरज नाही!
2 ..अन् ट्विटरने स्वतःच्याच सीईओचे अकाऊंट केले निलंबित
3 दुबईत राहणा-या ‘या’ भारतीयाच्या नावावर विश्वविक्रम
Just Now!
X