X

Video : धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला रोखण्यासाठी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याने पाहा काय वापरले…

'असा' शिकवला धडा

सिगारेट आरोग्यासाठी तर हानीकारक आहेच पण पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणे हे त्या व्यक्तीबरोबरच इतरांसाठीही तितकेच धोक्याचे ठरु शकते. त्यामुळेच या कारणास्तव पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई आहे. याच्याशी निगडीत एक घटना नुकतीच समोर आली आहे. पेट्रोल पंपावर सिगारेट पिणे एका मुलाला भलतेच महागात पडले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी बऱ्याचदा सांगूनही जेव्हा या मुलाने त्यांचे ऐकले नाही तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.

बुल्गेरिया देशाची राजधानी असलेल्या सोफियामध्ये ही घटना घडली. या ठिकाणी एका पेट्रोल पंपावर एक काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली. त्यातून एक मुलगा बाहेर आला जो सिगारेट ओढत होता. त्याच्या आसपास पूर्णपणे सिगारेटचा धूर झाला होता. त्याला पेट्रोल पंपावरील कर्मचारी सिगारेट विझवण्यास सांगतात. मात्र, त्याने शेवटपर्यंत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याउलट हा मुलगा कर्मचाऱ्यांशीच वाद घालत राहिला. तेव्हा एका कर्मचाऱ्याने त्याला चांगलाच धडा शिकवला . तो फ्युएल डिसपेन्सरजवळ ठेवलेला फायर डिस्टींगविशर घेतो आणि या मुलावर स्प्रे करायला सुरु करतो. ज्यामुळे मुलगा आणि त्याच्या गाडीच्या आसपास पूर्णपणे धूर होतो. त्यानंतर हा मुलगा कर्मचाऱ्याशी वाद घालतो. विशेष म्हणजे हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याबद्दल जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain