09 July 2020

News Flash

सरन्यायाधीशांचा Harley Davidson वरील फोटो व्हायरल, प्रशांत भूषण यांनी केली टीका

लॉकडाउनमुळे सरन्यायाधीश शरद बोबडे हे त्यांचं मूळ गाव नागपूरला...

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कारण या फोटोमध्ये सरन्यायाधीश हार्ले डेव्हिडसन या सुपर बाइकवर बसलेले दिसतायेत. त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. पण, याच फोटोवरुन वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश बोबडे यांच्यावर टीका केली आहे.

“सर्वोच्च न्यायालय लॉकडाउन मोडमध्ये ठेवून आणि नागरिकांना न्याय मिळण्याचा मूलभूत अधिकार नाकारुन सरन्यायाधीश नागपूरमध्ये ५० लाख रुपये किंमतीची भाजपाच्या नेत्याची मोटरसायकल चालवतात…तेही मास्क आणि हेल्मेट न घालता…”अशी टीका वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केली आहे. सरन्यायाधीशांचा फोटो ट्विटरवर शेअर करुन त्यांनी ही टीका केली आहे.


लॉकडाउनमुळे सरन्यायाधीश शरद बोबडे हे त्यांचं मूळ गाव नागपूरला आले असून तेथूनच ते सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी घेत आहेत. रविवारी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, त्यावेळचा हा फोटो असल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 2:00 pm

Web Title: photo of cji sharad bobde on a harley davidson bike goes viral prashant bhushan reacts says hes without a mask or helmet sas 89
Next Stories
1 शेतीमधून वर्षाकाठी २ कोटींचं उत्पन्न, केरळमधल्या ‘Open Jail’ ची यशोगाथा
2 आता बाजारात आली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी मिठाई
3 TikTok वर व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी महिलेला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि १४ लाखांचा दंड
Just Now!
X