23 November 2017

News Flash

सेल्फीच्या कॉपीराईट्सची माकडाची लढाई संपली; फोटोग्राफरकडून मिळणार २५% रक्कम

'मंकी सेल्फी' नावाने या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला

मुंबई | Updated: September 13, 2017 4:40 PM

'मंकी सेल्फी' नावाने या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

हा फोटो तुमच्या चांगलाच परिचयाचा असेल. ‘नरुटा’ नावाच्या या माकडाचा सेल्फी काही वर्षांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता. जेवढी माकडाच्या सेल्फीची चर्चा रंगली, तितकाच या सेल्फीच्या कॉपीराईटचा वादही गाजला. माकडाच्या सेल्फीवर कॉपीराईट्स नेमके कोणाचे? त्याचे? की फोटोग्राफर्सचे? यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. फोटोग्राफर डेव्हिड स्लॅटर आणि पेटा या दोघांमध्ये वाद सुरू होता. पण आता त्या वादावर तोडगा काढण्यात आला आहे. तेव्हा यापुढे नरुटाला स्वामित्व हक्कातला २५ टक्के वाटा मिळणार आहे.

वाचा : अजब गजब! ‘या’ सणाला पुरलेल्या प्रेतांना बाहेर काढतात

२०११ मध्ये इंडोनेशियातील जंगलात स्लॅटरयांच्या कॅमेरातून माकडानेच हा फोटो टिपला होता. ‘मंकी सेल्फी’ नावाने या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. नरुटा माकड हे इंडोनेशियातल्या दुर्मिळ प्रजातीचं माकड आहे, स्लॅटर या माकाडाच्या फोटोवर स्वामित्त्वाचे हक्क सांगत असला तरी हे हक्क नरुटाचे आहेत अशी भूमिका पेटाने मांडली आणि त्यांनी अमेरिकेतील न्यायालयात धाव घेतली होती. पण कॉपीराईटचे नियम प्राण्यांना लागू होत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला होता.
‘नरुटा विरुद्ध स्लॅटर’ या गाजलेल्या प्रकरणावर आता तोडगा निघाला आहे. पेटा आणि स्लॅटर या दोघांमध्ये समझोता झाला आहे. या फोटोच्या कमाईतील २५ टक्के रक्कम नरुटाला मिळणार आहे. ही रक्कम त्याच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.

First Published on September 13, 2017 4:40 pm

Web Title: photographer david slater the monkey selfie case has finally been settled
टॅग Monkey Selfie