News Flash

कॅनडाच्या पंतप्रधानांचे तरूणपणीचे फोटो प्रचंड व्हायरल

जगभरातल्या तरूणी घायाळ!

पंतप्रधानांचे लहानपणीचे फोटो प्रसिध्द!

ते देखणे होतेच! २०१५ साली कॅनडाच्या पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतल्यावर लगेच जस्टिन ट्रुडो जगभर चर्चेच आले. एरवी पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष या सगळ्या पदांवर जगभरात किमान साठी पार केलेले राजकारणी दिसत असताना कॅनडाच्या पंतप्रधानपजी आलेला हा तरूण राजकारणी चटकन सगळ्यांच्या नजरेत भरला. राजकारण्यांपैकी थोडेजणच दिलखुलासपणे हसू शकतात. जस्टीन ट्रुडो त्यांपैकीच एक. त्यांचं वागणं बोलणं वावरणं हे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरले होतं. एक हँडसम राजकारणी म्हणून त्यांची ओळख होतीच.

पण दोन-तीन दिवसांपूर्वी ट्रुडो यांचे लहानपणीचे फोटो नेटवर व्हायरल झाले आणि हलकल्लोळ माजला. व्हॅलेंटाईन डे नंतर पहिल्यांदाच जगभर सगळीकडे प्रेमभावना दाटून आली. पहा कॅनडाचे पंतप्रधान लहानपणी कसे होते ते.

 

कोणी इतकं हँडसम कसं असू शकतं? कोणी इतकं हँडसम कसं असू शकतं?

हा फोटोमध्ये तरी ट्रुडो जवळपास आता दिसतात तसेच दिसत आहेत पण या पुढच्या फोटोमधल्या ‘सर्फर बाॅय’ पोझमधल्या जस्टीननी तरूणींची हृदयं घायाळ केली

सर्फर बाॅय जस्टीन! सर्फर बाॅय जस्टीन!

 

आणि त्यांच्या किशोरवयातल्या या पुढच्या फोटोमुळे ‘गोग्गोड’ प्रतिक्रिया उमटल्या

किशोरवयातही सिक्स पॅक अॅब्स! किशोरवयातही सिक्स पॅक अॅब्स!

तर काय आहे जस्टीन ट्रुडोंच्या ‘सेहत का राज?’. अगदी लहान वयापासून नियमित व्यायाम करून आहार चांगला ठेवल्याने त्यांची प्रकृती अतिशय उत्तम राहिली आहे. आणि फक्त प्रकृती उत्तम असून भागतं काय? मघा म्हटलं तसं दिलखुलासपणे आणि मनमोकळं हसण्याची वृत्तीही जागृत ठेवावी लागते. नाहीतर जिम मारून तयार झालेले अरनाॅल्ड पाच-पाच मिनिटाला दिसतात.

जस्टिन ट्रुडोंची लोकप्रियता आणि त्यांचं फॅन फाॅलोईंग गेल्या काही दिवसात जगभर अचानक वाढलं आहे. त्यात ते कॅनडाचे म्हणजेच एका पुढारलेल्या इंग्लिश बोलू शकणाऱ्या देशाचे पंतप्रधान असल्यामुळेही त्यांना ही जागतिक लोकप्रियता मिळवणं तुलनेने सोपं ठरतंय. नाहीतरी जगात आता ज्याच्याकडे पाहून प्रसन्न वाटेल असे राजकारमी कमीच उरले आहेत. आणि ज्या अध्यक्षपदाकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं त्या खुर्चीमध्ये कोण बसलेत तर हे महाशय….

तरूणपणीचे डोनाल्ड ट्रम्प....बाथरोबमध्ये! तरूणपणीचे डोनाल्ड ट्रम्प….बाथरोबमध्ये!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 11:30 am

Web Title: photos of young justin trudeau go viral on the net
Next Stories
1 चंद्रावर डिलिव्हरी हवीये? ‘अॅमेझाॅन’ आहे ना!
2 ७ महिन्यांची गरोदर असतानाही ती ३ दिवस राबली!
3 ११ व्या वर्षी दिली बारावीची परीक्षा
Just Now!
X