News Flash

Farmer Protest : रिहानाच्या हातात पाकिस्तानी झेंडा? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून पाकिस्तानच्या झेंड्यासोबत रिहानाचा फोटो व्हायरल

( सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो )

शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप सिंगर रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून रिहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

व्हायरल फोटोमध्ये रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

(रिहानाच्या पाठिंब्यानंतर क्रिकेटपटूंची ‘बॅटिंग’! सचिनपासून शास्त्री गुरूजींपर्यंत; अजिंक्य-विराटनेही दिली प्रतिक्रिया)

(“प्रिय BCCI, प्लिज क्रिकेटपटूंना बळजबरीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावू नका…”)

काय आहे सत्य ?

रिहानाचा फोटो व्हायरल करण्यात उत्तर प्रदेश भाजपा प्रवक्ता शलभ मनी त्रिपाठी आणि उत्तर प्रदेशमधील भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता अभिषेक मिश्राचाही हातभार लागला. मिश्राने हा फोटो शेअर करुन एक ट्विट केलं होतं, ते ट्विट त्रिपाठी यांनी रिट्विट केलं आणि फोटो अजून व्हायरल झाला. मात्र, व्हायरल फोटो गुगलवर रिव्हर्स सर्च केल्यानंतर आयसीसीचं जुलै 2019 मधील एक ट्विट समोर येतं. दोन्ही फोटोवरुन हे स्पष्ट होतं की एडिटिंग करुन रिहानाच्या हातातला वेस्ट इंडिजचा झेंडा हटवून त्या जागी पाकिस्तानचा झेंडा पेस्ट करण्यात आला आहे.


पॉप सिंगर रिहानाने 2019 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीज टीमला पाठिंबा दिला होता. वेस्ट इंडिज टिमला पाठिंबा देणाऱ्या रिहानाचा फोटो एडिट करुन शेअर केला जात आहे. खऱ्या फोटोमध्ये तिच्या हातात पाकिस्तानचा नाही तर वेस्टइंडिजचा झेंडा आहे.

(सर्व क्रिकेटर्स म्हणजे ‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का’ ! रोहित शर्माच्या ट्विटवर भडकली कंगना)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2021 8:42 am

Web Title: photoshopped photo of rihanna with pakistan flag goes viral after her tweet in support of farmers protest sas 89
Next Stories
1 Viral: शौचालयात बिबट्यासोबत अडकला कुत्रा; पुढे काय झालं ते एकदा बघाच
2 ‘सबका साथ सबका विकास योजने’अंतर्गत मोदी सरकार प्रत्येकाला देणार एक लाख?; जाणून घ्या काय म्हणालं सरकार
3 कौतुकास्पद! …म्हणून ‘हा’ भारतीय उद्योजक कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही देणार पगार
Just Now!
X