अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे लागलेले नेटीझन्सचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपतच नाही. त्यांच्याविषयी काही चांगले बोलायचेचे नाही असा चंगच नेटीझन्सने बांधला आहे. त्याला अनेक कारणेही आहेत म्हणा. प्रचारच्या वेळी ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य करत अनेकांचा रोष ओढावून घेतला होता. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर तर अनेकांनी उघडपणे ट्रम्प यांना विरोध दर्शवला त्यांच्याविरुद्ध निदर्शने करत अनेक जण रस्त्यावर उतरले. त्यातून मुस्लिम देशांतून येणा-या लोकांवर त्यांनी अमेरिकेत यायला बंदी घातली त्यामुळे नेटीझन्सचा त्यांच्यावरील रोष अधिकाअधिक वाढतच गेला. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांचा न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक फोटो समोर आल्यानंतर तर नेटीझन्सने पुन्हा एकदा ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध वृत्तपत्र आणि नेटीझन्स असा वाद सुरू झाला आहे.

वाचा : हिटलरपासून ६६९ ज्यू मुलांना वाचवणारा देवदूत

या वृत्तपत्राने एक लेख प्रसिद्ध करत डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘बाथरोब’ मधला एक फोटो प्रकाशित केला होता. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून ट्रम्प यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी नेटीझन्सने सोडली नाही. त्यामुळे राग अनावर झालेल्या ट्रम्प यांनी हे फोटो कथित असल्याचे ट्विट केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे वृत्तपत्र माझ्यावर खोट्या बातम्या रचत असल्याचेही ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हे फोटो बनवाट आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे.  तर दुसरीकडे व्हाइट हाउसचे जनसंपर्क प्रमुखही भडकले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एकही ‘बाथरोब’ नाही त्यामुळे असे फोटो प्रकाशित करणं चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली आहे. आपला बाथरोबमधला फोटो छापल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली आहे.